महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रक्षाबंधन सणासाठी येणाऱ्या बहीण- भावावर काळाची झडप

04:53 PM Aug 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कार आणि आयशर टेम्पो अपघातात दोघे जागीच ठार : बहीण, भाऊ मंगळवेढा येथील : पंढरपूर तालुक्यातील कासार मळा येथील अपघात

पंढरपूर प्रतिनिधी

नियती कधी कधी अत्यंत निष्ठुर होते. आज सोमवारी असणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिणीस कारमधून घेऊन येणाऱ्या मंगळवेढा येथील भाऊ आणि बहीण यांच्यावर सणाआधीच मृत्यूने झडप घातली.

Advertisement

पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासार मळा येथे स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात झाला आहे.

Advertisement

अपघातातील मृत ऋतुजा जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनासाठी ती एसटी बसने पंढरपूरला आली होती. पंढरपूरहून मंगळवेढा येथे घरी घेऊन जाण्यासाठी भाऊ रोहित जाधव हा तिला आणायला गेला होता. ते दोघे मंगळवेढ्याकडे जात असताना काळाने वाटेतच घाला घातला.

पंढरपूरहून मंगळवेढाकडे निघालेली स्विफ्ट कारची (एमएच 13-बीएन 6649) पंढरपूरकडे येत असलेला आयशर टेम्पोशी (आरजे 36-जीए 8971) समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून या भीषण अपघातात भाऊ रोहित तात्यासो जाधव (वय 25), बहीण ऋतुजा तात्यासो जाधव (वय 19, दोघे रा. मंगळवेढा) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना त्वरित पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी ते मृत पावले असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :
Mangalvedha carRakshabandhan festival
Next Article