महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

4 हजार वर्षांपूर्वी उभारलेला पूल

06:38 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

50 वर्षापर्यंत होत राहिले उत्खनन

Advertisement

जमिनीत अनेक रहस्ये खोलवर दडलेली आहेत. जेव्हा उत्खनन होते, तेव्हा याचे पुरावे मिळू लागतात. अनेक ठिकाणी इतिहासाशी निगडित हजारो वर्षे जुन्या गोष्टी जमिनीत गाडल्या गेल्या आहेत. असेच एक ठिकाण दक्षिण इराकमध्ये बगदाद आणि बसराच्या आधुनिक शहरांदरम्यान स्थित गिरसूचे प्राचीन सुमेरियन शहर आहे. हे जगातील सर्वात प्रथम ज्ञात शहरांपैकी एक असून ते लगश साम्राज्याची राजधानी होते. येथे सातत्याने उत्खनन सुरू असते आणि इतिहासाशी निगडित गोष्टी समोर येत असतात.

Advertisement

शहराच्या आर्थिक, प्रशासकीय आणि वाणिज्यिक विषयक नोंदींसोबत हजारो क्यूनिफॉर्म गोळ्यांच्या स्वरुपात सुमेरियन संस्कृतीची पुरावे काही वर्षांपूर्वी हाती लागले होते. या विशाल पुरातत्व स्थळावर 50 वर्षांपासून सातत्याने उत्खनन होत राहिले, ज्यात सुमेरियन कला आणि वास्तुकलेची काही सर्वात महत्त्वपूर्ण कलाकृती समोर आल्या. यात विटांनी तयार केलेले 4 हजार वर्षे जुने पूल देखील सामील आहे. हे आतापर्यंत शोधण्यात आलेले जगातील सर्वात जुने पूल आहे. क्यूनिफॉर्म टॅबलेट एक प्रकारची लिपी असून ती इराणमध्ये ख्रिस्तपूर्व 7 पासून ईसवी सवन 1 हजार वर्षांपर्यंत प्रचलित राहिली.

गिरसू येथे उत्खनन सर्वप्रथम 1877 मध्ये फ्रेंच पुरातत्व तज्ञांच्या एका पथकाकडून करण्यात आले होते. परंतु तेव्हा काहीच हाती लागले नव्हते. कारण त्यादरम्यान उत्खनन आणि संरक्षणाच्या आधुनिक तंत्रज्ञानांचा शोध लागला नव्हता. तेव्हा फ्रेंच देखील प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते, यामुळे त्यांनी वास्तुशिल्प अवशेषांच्या संरक्षणाकडे फारच कमी लक्ष दिले. यानंतर येथे अनेक लोकांनी खजिना शोधण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात टॅबलेट आणि अन्य अनमोल कलाकृती लुटून संग्राहकांना विकून टाकल्या. गिरसू येथून 35 हजार ते 40 हजार टॅबलेट लुटण्यात आल्या आणि नंतर बाजारात विकल्या गेल्या. तर फ्रेंच पथकाकडून झालेल्या उत्खननात केवळ 4 हजार टॅबलेट सापडल्या होतय.

पुलाचे अवशेष

गिरसूचे उत्खनन अनेक वर्षांपासून सुरू होते, परंतु 1920 मध्ये पहिल्यांदा तेथे जगातील सर्वात जुन्या पूलाचा शोध लागला. परंतु त्यावेळी याची वेगवेगळ्या प्रकारे व्याख्या करण्यात आली, ज्यात लोक याला मंदिर, धरण आणि जलनियामक स्थळ ठरवत राहिले. पण 2016-17 मध्ये या संरचनेची ओळख एका प्राचीन जलमार्गावर निर्मित पूलाच्या स्वरुपात करण्यात आली. या शोधानंतरही याच्या संरक्षणाचा कुठलाच प्रयत्न करण्यात आला नाही आणि योजनाही आखली गेली नाही. गिरसूचे आधुनिक अरबी नाव टेलो आहे. या स्थळाचा उपयोग सध्या ब्रिटनच्या सरकारकडून प्राप्त निधीद्वारे ब्रिटिश संग्रहालयाकडून विविध उद्देशांसाठी केला जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article