केवळ बटाटा खायचा मुलगा
7 वर्षांपर्यंत अन्य काहीच खाल्ले नाही
ब्रिटनमध्ये 8 वर्षीय मुलगा केवळ बटाटे खाऊन जिवंत होता. त्याला बटाट्याशिवाय अन्य काही खाणे आवडत नव्हते. मुलाने अत्यंत कमी वयापासून बटाट्याशिवाय अन्य काहीही खाणे बंद केले होते. दुसरी फळे आणि भाज्या खाताच त्याला उलटी होण्यास सुरुवात व्हायची असे त्याच्या आईवडिलांचे सांगणे आहे. मुलाच्या या विकारामुळे आईवडिल अत्यंत त्रस्त होते. 8 वर्षीय मुलगा खाण्यात अत्यंत नखरेबाज होता. त्याने 7 वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात बटाटे फस्त केले, या मुलाचे नाव लेनी सार्टिन आहे. लेनीने स्वत:च्या आयुष्यात बटाट्याशिवाय काहीच खाल्ले नव्हते.
लेनी दरदिनी जेवणात बीन्स आणि पनीरसोबत बेक्ड बटाटे खात होता, स्वत:च्या आयुष्यात त्याने 2500 वेळा केवळ बटाटे खाल्ले होते असे त्याच्या आईवडिलांनी सांगितले. लेनीने वयाच्या 18 व्या महिन्यापासूनच बटाट्याशिवाय अन्य काही खाणे बंद केले होते. तो बालपणापासून खाण्यात नखरे करायचा आणि केवळ बटाटे खायचा. हळूहळू त्याला बटाटे इतके आवडायला लागले की त्याने त्याशिवाय अन्य काही खाल्ल्यास उलटी व्हायची अशी माहिती त्याची आई केली आणि वडिल लुईस यांनी दिली.
स्वत:च्या मुलाच्या खाण्यात आणखी गोष्टी सामील करण्यासाठी लेनीच्या आईवडिलंनी एका संमोहक चिकित्सक डेव्हिड किल्मरी यांची मदत घेतली. संमोहन चिकित्सेच्या दोन तासांच्या सत्रानंतर 8 वर्षीय लेनीने पहिल्यांदाच अन्य फळाची चव चाखली. आता त्याची उंची वाढली असून ऊर्जेचा स्तरही वाढला आहे. स्टॅनफोर्ड-ले-होप, एसेक्स येथे राहणाऱ्या 34 वर्षीय केलीने याविषयी माहिती दील.
10 पैकी 9 वेळा लेनी बटाटे खाणार असल्याचे सांगायचा, तो नेहमीच बीनस आणि चीजसोबत बटाटेच खात होता. आम्ही अधिक चिंतेत होतो, लेनी अत्यंत खेळकर होता, परंतु त्याची ऊर्जा कमी होती. तो अनेकदा संध्याकाळीच झोपी जायचा आणि त्याच्या एका पायात नेहमी वेदना असायच्या. मग आम्ही त्याला एका बालरोगतज्ञाकडे नेले, त्यांनी एक डायट चार्ट दिला, परंतु लेनीला आम्ही वेगळे काही खाण्यास दिल्यास त्याला उलटी व्हायची. दुपारच्या भोजनात तो कधीकधी पोटॅटो वफल खायचा, परंतु त्याचे मुख्य भोजन नेहमीच बेक्ड पोटॅटो असायचे, असे केली यांनी सांगितले.
अन्य मुलांमध्ये कुठल्याही एका खाद्यपदार्थाविषयीचा अतिरेक कमी करणाऱ्या चिकित्सकाविषयी आम्ही ऐकले, मग त्यांची भेट घ्यायचा आम्ही निर्णय घेतला, त्यांचे नाव डेव्हिड किल्मरी होते. लेनीला खाण्याची भीती होती, कारण आयुष्यभर त्याने बटाटेच खाल्ले होते, त्याच्या पायांमध्ये समस्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीराची स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे डेव्हिड यांनी आम्हाला सांगितले. डेव्हिड यांच्या एका सत्रानंतरच आश्चर्यकारक बदल झाला. लेनी स्ट्रॉबेरी आणि केळी यासारखी फळे अन् खाद्यपदार्थ खाण्यास सक्षम झाला. अन्य खाद्यपदार्थांबद्दलची त्याची भीती दूर झाली. लेनी आता भाज्या आणि फळांसह 24 विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्यास सक्षम असल्याचे केली यांनी सांगितले.