रेल्वेतच राहणारा मुलगा
दरदिनी करतो 1 हजार किमीचा प्रवास
जगात अनेक लोक स्वच्छंदी जगणे पसंत करत असतात. याचमुळे ते आईवडिलांचे घर सोडून स्वत:च्या पायांवर उभे राहण्यासाठी इतरत्र जात राहण्यास सुरुवात करतात. अशाचप्रकारचे कृत्य जर्मनीतील एका युवकाने केले आहे. तो स्वत:च्या आईवडिलांचे घर सोडून अन्य रहायला लागला आहे, परंतु तो जेथे राहतो ती जागा अत्यंत हैराण करणारी आहे. हा युवक आता रेल्वेमध्येच राहतो. आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वेत राहण्यासाठी तो याचे भाडे देखील देतो.
17 वर्षीय लास्से स्टॉली जर्मनीची सरकारी रेल्वे कंपनी ड्यूश बहानच्या रेल्वेंमधून प्रवास करतो आणि रेल्वेगाडीलाच त्याने स्वत:चे घर केले आहे. हा युवक रेल्वेत राहून दिवसभर प्रवास करतो आणि याच्या बदल्यात भाडेही भरतो. अशाप्रकारचे जीवन जगत असल्याने माझ्याकडे भरपूर स्वातंत्र्य आहे. कुठे रहायचे आहे मी स्वत:च ठरवितो, कधी मी पर्वतांमध्ये जातो, तर कधी समुद्रानजीक राहण्यासाठी जात असतो असे युवकाने सांगितले आहे.
वयाच्या 16 व्या वर्षी प्रवासास प्रारंभ
लास्से 16 वर्षांचा असताना त्याने कायदेशीर स्वरुपात रेल्वेंमध्ये राहून स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करावी अशी आईवडिलांची मनधरणी केली. स्वत:चा प्रवास सुरु करण्यापूर्वी त्याने स्वत:च्या खोलीची सफाई केली आणि मग बहुतांश सामग्रीची विक्री केली. आतापर्यंत त्याने 5 लाख किलोमीटर अंतराचा प्रवास केला आहे. या हिशेबाने तो दिवसाला एक हजार किलोमीटरचा प्रवास करत आहे. त्याच्याकडे जागेची खूपच मोठी कमतरता असते, यामुळे तो केवळ 4 टीशर्ट, नेक पिलो, ब्लँकेट, लॅपटॉप आणि हेडफोन्स घेऊन प्रवास करतो. तर सुपरमार्केट्समधून सामग्रीची खरेदी करत तो स्वत:च्या खाण्याची व्यवस्था करतो किंवा मोठ्या रेल्वेस्थानकांच्या कॉम्प्लिमेंटरी बुफेमध्ये तो खात असतो.
इतका आहे खर्च
एखादा व्यक्ती प्रवास करत असेल तर रेल्वेत कसा राहू शकतो असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु त्याने जर्मनीची रेल्वे डिस्काउंट स्कीम निवडली आहे, यात त्याने बाहनकार्ड 100 ची खरेदी केली आहे. हा एकप्रकारचा रेल्वे पास आहे, याची किंमत सुमारे 5 लाख इतकी आहे. म्हणजेच तो एक वर्षात 5 लाख रुपये खर्च करत रेल्वेत राहू शकतो.