For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृत व्यक्तींशी संवाद साधणारा ‘बूथ’

06:48 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
मृत व्यक्तींशी संवाद साधणारा ‘बूथ’
Advertisement

कोणतीही व्यक्ती एकदा मृत झाल्यानंतर कोणीही तिच्याशी संवाद साधता येणे अशक्य असते, हे सत्य आहे. काही दशकांपूर्वी मृत व्यक्तींशी कथित संवाद साधणाऱ्या ‘प्लँचेट’ नामक माध्यमाचा बराच सुळसुळाट झाला होता. अनेकांना प्लँचेट करुन आपल्या मृत कुटुंबियांशी संवाद साधण्याचा जणू नादच लागला होता. पण कालांतराने या प्रकारातील लोकांचे स्वारस्य कमी झाले. अलिकडच्या काळात प्लँचेटच्या कहाण्या फारशा ऐकू येत नाहीत. तथापि, सध्या मृतांशी संवाद घडविणारा टेलिफोन बूथ चर्चेत आला आहे. जपान देशाच्या ओत्सुकी येथे असा एक टेलिफोन बूथ आहे. हा बूथ कोणत्याही नेटवर्कशी जोडला गेलेला नाही. तरीही तो ‘कार्यरत’ आहे. ज्यांना आपल्या मृत कुटुंबियांशी संपर्क करायचा आहे, असे लोक या बूथवर जातात. त्या बूथवरच्या टेलिफोनमधून आपल्या मृत नातेवाईकांशी संवाद साधतात, अशी माहिती दिली जाते. या बूथला ‘द विंड फोन बूथ’ असे संबोधले जाते. ज्यांना आपल्या कुटुंबियांचा मृत्यू असह्या झालेला आहे, असे सहस्रावधी लोक या फोनबूथचा आधार घेतात, असे दिसून आलेले आहे.

Advertisement

दु:खी लोक या बूथवर येतात. रिसिव्हर उचलतात आणि आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन देतात. मृत कुटुंबियांशी बोलतात. ते या फोनवर जे बोलतात, ते त्यांच्या मृत कुटुंबियांपर्यंत पोहचते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. आपले मन हलके झाल्याचा अनुभव या फोनवर बोलल्याने येतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. हा बूथ इतारु सासाकी नामक व्यक्तीने त्याच्या मृत चुलत भावाशी संवाद साधण्यासाठी स्थापन केला होते. 2011 च्या महाविनाशकारी सुनामीत अनेक जणांचा मृत्यू ^झाला. त्यानंतर त्यांनी हा फोनबूथ सर्वांच्या उपयोगासाठी मोकळा केला. तेव्हापासून आतापर्यंत 30 सहस्रांहून अधिक लोक त्याचा उपयोग केला आहे. आता हा उपाय जगात सर्वत्र पसरत असून अमेरिकेतही असे 200 फोनबूथ स्थापन झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.