For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धादरम्यान नेतान्याहू यांना झटका

06:27 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
युद्धादरम्यान नेतान्याहू यांना झटका
Advertisement

युद्ध मंत्रिमंडळाच्या सदस्याचा राजीनामा

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

इस्रायलच्या युद्ध मंत्रिमंडळाचे सदस्य बेनी गँट्ज यांनी राजीनामा दिला आहे. युद्धानंतरच्या गाझासाठी योजना नसल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला आहे. हे पाऊल पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या पदाला तत्काळ धोका निर्माण करणारे नाही. कारण संसदेत नेतान्याहू यांच्या आघाडीला अद्याप बहुमत आहे. परंतु यामुळे ते स्वत:च्या अन्य सहकाऱ्यांवर अधिक निर्भर राहणार आहेत.  नेतान्याहू हे गाझामध्ये प्रत्यक्ष विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यापासून आम्हाला रोखत आहेत. याचमुळे मी जड अंतकरणाने आपत्कालीन सरकारमधून बाहेर पडत असल्याचे गँट्ज यांनी म्हटले आहे.

Advertisement

गँट्ज यांनी या निर्णयासंबंधी नेतान्याहू यांना मागील महिन्यातच इशारा दिला होता. त्यावेळी त्यांनी 8 जूनपर्यंत गाझासाठी नवी योजना तयार करण्यास सांगितले होते. गँट्ज हे शनिवारीच राजीनामा देणार होते, परंतु इस्रायलच्या सुरक्षा दलांनी राबविलेल्या एका मोहीमेत 4 ओलिसांची मुक्तता झाल्यावर कळल्यावर त्यांनी हे पाऊल रोखले हेते. या मोहिमेत गाझामये 270 जणांचा मृत्यू झाला आहे.

गँट्ज यांना राजीनामा देण्यापासून रोखण्याचा नेतान्याहू यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. इस्रायलच्या आपत्कालीन सरकारमध्ये कायम राखण्याचे आवाहन नेतान्याहू यांनी त्यांना केले होते. वर्तमान महान कार्यांना सामोरे जाण्यासाठी आम्ही एकजूट राहण्याची गरज आहे. गँट्ज यांनी एकतेला संकटात आणू नये असे नेतान्याहू यांनी म्हटले होते.

7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर भ्याड हल्ले केले होते. या हल्ल्याच्या चार दिवसांनी युद्ध मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली होती. गँट्ज यांच्या निर्णयामुळे युद्ध मंत्रिमंडळात नेतान्याहू यांच्या पक्षाच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचे प्रतिनिधित्व शिल्लक राहणार नाही. पंतप्रधानांसोबत निर्णय घेण्याच्या शक्तीसोबत आपत्कालीन सरकारचे एकमात्र अन्य सदस्य संरक्षणमंत्री योव गॅलेंट आहेत. ते नेतान्याहू यांच्या लिकुड पार्टीचेच सदस्य आहेत.  गँट्ज यांच्या राजीनाम्यानंतर उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेते अन् राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटमार बेन-ग्विर यांनी त्वरित युद्धमंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाची मागणी केली आहे. साहसी निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.