महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फकीराकडून बडवून घेत मिळविला आशीर्वाद

05:25 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस उमेदवाराचे कृत्य : कमाल रजाने दिला चप्पलांचा मार

Advertisement

राजकीय पक्ष एकीकडे अत्यंत आकर्षक घोषणा करून मतदारांना स्वत:च्या बाजूने वळवू पाहत असताना उमेदवार देखील वैयक्तिक स्तरावर विजयासाठी प्रयत्नशील आहेत. कुणी मंदिराच्या पायऱ्या चढत आहेत, तर कुणी बाबा-फकीरांच्या आशीर्वादासाठी धाव घेत आहेत. याचदरम्यान मध्यप्रदेशच्या रतलाम येथील काँग्रेस उमेदवार पारस सकलेचा यांचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे. यात सकलेचा हे चप्पलांचा मार खात असल्याचे दिसून येते. व्यापमं घोटाळ्याचे व्हिसलब्लोअर आणि माजी आमदार पारस सकलेचा हे रतलाम शहर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहिले आहेत. मतदानापूर्वीचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती काँग्रेस उमेदवाराला चप्पलांनी बडवत असल्याचे दिसून येते. रतलाममध्ये बाबा कमाल रजा नावाचे एक फकीर अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते महू-नीमच रोडवरच फिरत असतात. फकीर कमाल रजा स्वत:कडे येणाऱ्या लोकांना चप्पलांनी बडवून आशीर्वाद देत असतात. याचमुळे त्यांच्याकडे जाणारे लोक नव्या चप्पलांची खरेदी करूनच जात असतात. रस्त्यांवर फिरणाऱ्या फकीरांचा लोक शोध घेत असतात आणि ते भेटताचा चप्पलांचा मार खाण्याची इच्छा व्यक्त करतात.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article