आकाशात उलटा उडू शकणारा पक्षी
माणसांप्रमाणे घोरण्याची सवय
स्नोरिंग हमिंगबर्ड आकाशात कलाबाजी करण्यासाठी ओळखला जातो. हा पक्ष आकाशात पुढे, मागे, सरळ आणि उलट्या दिशेने देखील उडू शकतो. तसेच आकाशात उलटा लटकलेल्या स्थितीतही हा पक्षी दिसून येत असतो. याचबरोबर हा पक्षी माणसांप्रमाणे घोरत असतो. आता या पक्ष्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हमिंगबर्ड्स रात्री विश्रांतीदरम्यान विशिष्ट प्रकारचा आवाज करतात. हा आवाज हमिंगबर्डच्या घोरण्यासारखा वाटतो. हा पक्षी स्वत:ची ऊर्जा वाचविण्याकरता हा प्रकार करत असतो असे तज्ञांकडून सांगण्यात आले. विश्रांती घेताना किंवा झोपेदरम्यान हा पक्षी अशाप्रकारचा आवाज काढतो जो ऐकून जणू तो घोरत असल्याचे वाटू लागते. सुस्तीदरम्यान हमिंगबर्ड स्वत:च्या हृदयाची गती आणि शरीराचे तापमान कमी करत असतो. यादरम्यान हा पक्षी दीर्घ श्वास घेतो, ज्यामुळे तो मोठमोठे आवाज काढत असतो.
अद्भूत उड्डाणक्षमता
स्नोरिंग हमिंगबर्डकडे अद्भूत उड्डाणक्षमता असते. हा एक असा पक्षी आहे, जो दीर्घकाळापर्यंत आकाशात विहार करू शकतो. तसेच तो मागील दिशेने आणि उलट्या दिशेने देखील उडू शकतो. उड्डाणादरम्यान हा पक्षी वेगाने स्वत:ची दिशा बदलू शकतो. स्वत:च्या अनोख्या पंखांमुळे त्याला हे शक्य होते. स्वत:चे पंख तो 180 अंशापर्यंत वळवू शकतो. हा पक्षी एका सेकंदात 20-80 वेळा स्वत:चे पंख फडफडत असतो. याचमुळे या पक्ष्याला ‘हवाई कलाबाज’ मानले जाते. हमिंगबर्ड उलटे देखील झोपतात, यामुळे त्यांना हमिंगबर्ड टॉरपोर देखील म्हटले जाते. या पक्ष्याचे पंख चमकणाऱ्या रंगांचे असतात आणि नर हा मादीच्या तुलनेत अधिक रंग बाळगून असतो आणि याची चोच काळ्या रंगाची परंतु लांब असते.