महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खलिस्तान समर्थकांना न्युझीलंडमध्ये मोठा झटका

06:43 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताच्या सार्वभौमत्वाचा करतो आदर : न्युझीलंड

Advertisement

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

Advertisement

न्युझीलंडमध्ये खलिस्तान समर्थकांना मोठा झटका बसला आहे. ऑकलंडमध्ये आयोजित वादग्रस्त कथित खलिस्तान जनमत चाचणीनंर न्युझीलंडच्या सरकारने मोठे वक्तव्य केले आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्वाच सन्मान करण्याच्या प्रतिबद्धतेचा न्युझीलंडच्या सरकारने पुनरुच्चार केला आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिसकडून ही कथित जनमत चाचणी करविण्यात आली होती.

भारतात एनआयए आणि राज्य पोलिसांकडून शिख फॉर जस्टिसच्या सदस्यांच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कथित जनमत चाचणीबद्दल आम्हाला कल्पना आहे. न्युझीलंड जगात मानवाधिकारांचा एक मजबूत समर्थक आहे. परंतु अशाप्रकारचा कुठलाही प्रयत्न हा वैध आणि शांततापूर्ण असावा हे सुनिश्चित केले जावे असे न्युझीलंडच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

शिख फॉर जस्टिसकडुन कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन समवेत अनेक देशांमध्ये अशाप्रकारची जनमत चाचणी करविली जात आहे. न्युझीलंडमध्ये झालेल्या या कथित जनमत चाचणीचे पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन केले आहे. या जनमत चाचणीवेळी पाकिस्तानचा एक पत्रकारही उपस्थित होता. अनेक खलिस्तान समर्थकांच्या त्याने मुलाखती घेतल्या आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय भारतविरोधी शक्तींना खतपाणी घालत असून खलिस्तान समर्थकांना त्याचीच फूस आहे.

भारत आणि न्युझीलंड यांच्यात दीर्घकाळापासून सकारात्मक आणि मजबूत संबंध राहिले आहेत. याचमुळे न्युझीलंडने भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच्या उलट शिख फॉर जस्टिस या संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिका आणि कॅनडात बसून भारताच्या विरोधात गरळ ओकत आहे.  खलिस्तान समर्थकांच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणावही निर्माण झाला आहे. तर अमेरिकेने पन्नूच्या हत्येच्या कटावरून एका भारतीय नागरिकावर आरोप केले आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article