महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात उच्च न्यायालयाकडून केजरीवालांना मोठा झटका

07:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीशी निगडित वादावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली आहे. न्यायाधीश बिरेन वैष्णव यांनी स्वत:चा मागील निर्णय कायम ठेवला, परंतु पुनर्विचार याचिका दाखल केल्याप्रकरणी केजरीवाल यांना नव्याने दंड ठोठावलेला नाही. गुजरात विद्यापीठाच्या दाव्यानुसार पदवी वेबसाइटवर उपलब्ध नाही, असा दावा केजरीवालांनी पुनर्विचार याचिकेत केला होता. तर केजरीवालांनी स्वत:ला ठोठावण्यात आलेल्या 25 हजार रुपयांचा दंडही चुकीचा असल्याचे म्हटले होते. केजरीवालांकडून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणीची तयारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बिरेन वैष्णव यांनी दाखविली होती. न्यायाधीशांनी या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी केल्यावर 29 सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article