महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यायालयाकडून केजरीवालांना मोठा झटका

06:22 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचा आदेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. ईडीने वारंवार समन्स बजावूनही हजर राहिल्याप्रकरणी न्यायालयाने केजरीवालांना सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे. केजरीवालांना 17 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 5 समन्स बजावण्यात आल्यावरही केजरीवाल हे उपस्थित झाले नव्हते. याप्रकरणी ईडीकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करत राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने बुधवारी केजरीवालांना 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे.

दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडी केजरीवाल यांची चौकशी करू इच्छिते. याप्रकरणी केजरीवालांचा जबाब नोंदवून घ्यायचा असल्याचे ईडीचे सांगणे आहे. याकरता केजरीवालांना पाच समन्स बजावण्यात आले आहेत. परंतु केजरीवालांनी या समन्सला अवैध आणि राजकारणाने प्रेरित ठरवत फेटाळले होते आणि ईडीसमोर हजर होणे टाळले होते. ईडीने 2 फेब्रुवारी रोजी पाचवा समन्स जारी केला होता, तरीही केजरीवाल तपास यंत्रणेसमोर हजर राहिले नव्हते. यामुळे ईडीने न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणीच आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक झाली होती.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article