महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावईवेरे अनंत देवस्थानात भक्ती नाट्याधारा संगीत मैफल रंगली

12:00 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सावईवेरे : सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानच्या कालोत्सवातील सुप्रसिद्ध विजयरथोत्सवानिमित्त आयोजित केलेली भक्ती नाट्याधारा संगीत मैफल बरीच रंगली. युवा कलाकारांनी एकापेक्षा एक सरस अशी विविध गीते, अभंग गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. या मैफलीत पं. सुरेश वाडकर यांचे शिष्य योगेश बोरचोटे (माणगाव) कु. पल्लवी पिळणकर (माणगांव), सुरेश सिंधू रत्न पुरस्कार प्राप्त ऋचा पिळणकर (माणगांव) व सावंतवाडी येथील निधी जोशी या नामवंत युवा गायक कलाकारांनी अभंग, भावगीते, भक्तीगीते, शास्त्रिय, उपशास्त्रिय व नाट्यागीते सादर करून रसिकांना रिझविले. या गायक कलाकारांना बालकलाकार जास्मित पिळणकर याने तबल्याची साथ,हार्मोनियमची साथ मंगेश मेस्त्री, ओजस्वी पिळणकर तानपुरा यांनी सुरेख साथसंगत केली.कणकवलीचे निवृत्त अध्यापक संजय कात्रे यांनी निवेदनाची बाजू सांभाळली. या कार्यक्रमास बराच रसिक वर्ग उपस्थित होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article