For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुंदर, परंतु धोकादायक असणारे बेट

06:06 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुंदर  परंतु धोकादायक असणारे बेट
Advertisement

पाण्यात पोहण्यास घाबरतात लोक

Advertisement

स्वत:च्या सुंदर समुद्र किनारे असूनही रियुनियन बेट स्वत:च्या पाण्याखाली एक धोकादायक रहस्य सामावून आहे. शार्कच्या हल्ल्यांमुळे हे बेट त्रस्त झाले आहे. यामुळे हे सर्फरांसाठी सर्वात धोकादायक ठिकाण ठरले आहे. हिंदी महासागरात असलेले हे बेट स्वत:च्या अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.

रीयुनियन बेटाचा सक्रीय ज्वालामुखी ले पिटोन डे ला फोरनेज 1640 सालापासून आतापर्यंत 100 पेक्षा अधिक वेळा जागृत झाला आहे. यातून निघणारा धूर पूर्ण बेटावरून दिसून येतो. याची एकूण किनारपट्टी केवळ 207 किलोमीटर आहे. येथे लाव्हारस वाहणे लोकांना फारसे विशेष वाटत नाही. लाव्हारस थेट समुद्रात पोहोचत आल्याने लोकांना त्यापासून धोका नसतो. प्रत्यक्षात एक सक्रीय आणि निष्क्रीय ज्वालामुखी दोघांनीही या बेटाला आकार दिला आहे.

Advertisement

रीयुनियन बेट फ्रेंच क्षेत्र असून येथे फ्रान्स, मोझाम्बिक, भारत, चीन, मादागास्कर आणि कोमोरोसचे लोक राहतात. यामुळे या ठिकाणाला अनेक संस्कृतींचे सान्निध्य लाभले आहे. येथे अनेक देशांचे सण साजरे केले जातात, यात दिपावलीचा देखील समावेश आहे.

रीयुनियन बेटाचे वैशिष्ट्या येथील लाव्हारसाच्या प्रवाहामुळे निर्माण झालेली भुयारं आहेत. यामुळे रीयुनियन बेट जगातील सर्वात अनोखे बेट ठरते. या भुयारांचा अनपेक्षित आणि भव्य प्रवास बेटाच्या भूवैज्ञानिक रहस्यांचे दर्शन घडवितो. लाव्हारसचा वरचा थड झाल्यावर आणि मॅग्माचा प्रवाह जारी राहिल्याने ही भुयारं निर्माण झाली आहेत. या भुयारांना पाहण्यासाठी गाइडला सोबत नेणे अधिक चांगले ठरते.

रीयुनियन बेटावर अनेक गावं असून तेथे बेकरी आणि दुकानांना हेलिकॉप्टरद्वारे सामग्रीचा पुरवठा केला जातो. तेथे केवळ पायी किंवा हेलिकॉप्टरद्वारेच पोहोचता येते. या ठिकाणी प्रारंभीचे रहिवासी हे पलायन केलेले गुलाम होते. त्यांनी या दुर्गम स्थळांना स्वत:चे आश्रयस्थान म्हणून निवडले होते, कारण तेथे पोहोचणे अत्यंत कठिण होते.

रीयुनियन एक नॅशनल पार्क आणि जागतिक वारसास्थळ आहे. ज्वालामुखीय शिखरे आणि घनदाट जंगल, दलदलयुक्त भाग, बहुतांश काळ पावसामुळे एक अनोखे ठिकाण ठरते.

Advertisement
Tags :

.