For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कापसाच्या गोळ्याप्रमाणे दिसणारं वटवाघूळ

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कापसाच्या गोळ्याप्रमाणे दिसणारं वटवाघूळ
Advertisement

वटवाघळांना आतापर्यंत तुम्ही काळ्या किंवा करड्या रंगात पाहिले असेल. परंतु जगात पांढऱ्या रंगाचे वटवाघळंही असतात, ज्यांना पाहून अजिबात घाबरायला होत नाही. कारण हा जीव कापसाच्या बॉलप्रमाणे दिसून येतो. अत्यंत छोटे अणि गोंडस दिसून येणाऱ्या या वटवाघळांना पाहून हे जगातील सर्वात प्रेमळ जीव असल्याचे म्हणाल. कापसाच्या गोळ्याप्रमाणे आणि मोठे पिवळ नाक अन् कान असलेले हे वटवाघूळ अत्यंत कमी वजनाचे असते. मध्य अमेरिकेत होंडुरास, निकारागुआ आणि पनामा या देशांमध्ये आढळून येणाऱ्या या वटवाघळांना ‘होंडुरन व्हाइट बॅट’ या नावाने ओळखले जाते. त्यांना कॅरेबियन व्हाइट टेंट-मेकिंग बॅट किंवा कॉटन बॉल-बॅट्स देखील म्हटले जाते. याचे नाक उलटे असते, यामुळे हे अन्य वटवाघळांपेक्षा वेगळे आहे. पृथ्वीवर वटवाघळांच्या 1400 प्रजाती असून यात यांची संख्या केवळ 2 टक्के इतकीच आहे.

Advertisement

पानांखाली घरटे

मेल होंडुरन व्हाइट बॅट हा मादी वटवाघळांच्या तुलनेत थोडा मोठा आणि अधिक वजनाचा असतो. हा जीव हेलिकोनिया वृक्षाच्या पानांच्या खाली घरटे तयार करत असतो. पानांना फस्त करुनच हा पक्षी स्वत:ची भूक भागवत असतो. हा पक्षी काहीसा वळल्यावर एक छोटासा तंबूसदृश आकार निर्माण होतो, यामुळे हा वटवाघुळ इतर प्राण्यांपासून स्वत:चे रक्षण करू शकतो. याचमुळे याच्याकरता टेंट मेकिंग बॅट या शब्दाचा वापर केला जातो.

Advertisement

समुहात वास्तव्य

कधीकधी अनेक वटवाघळं एकाच पानाला चिकटून राहतात, जेथे ते दिवसा आराम करतात. एका समुहात कमाल 17 वटवाघळांचा समावेश असतो. सर्वसाधारणपणे वटवाघळं कीडे खात असतात. काही वटवाघळं रक्तही शोषून घेतात. परंतु होंडुरासमधील पांढऱ्या रंगाची वटवाघळं शाकाहारी असतात. हा जीव पानांखालीच स्वत:चे जीवन व्यतित करत असतो. अंजीर या जीवाला अत्यंत पसंत आहे. याचमुळे हा जीव अंजीराच्या झाडावर दिवसरात्र बसून असतो. याचा गंध त्यांना तेथे आकर्षित करत असतो. परंतु होंडुरासच्या पांढऱ्या वटवाघळांला इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरने लाल यादीत सामील केले आहे. कारण याची संख्या अत्यंत वेगाने कमी होत आहे. या वटवाघळांना वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

Advertisement
Tags :

.