For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur : कानाला पट्टी, अंगावर शाल ; कडाक्याच्या थंडीतही विठुरायाचे सौंदर्य कमाल!

04:06 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
pandharpur   कानाला पट्टी  अंगावर शाल   कडाक्याच्या थंडीतही विठुरायाचे सौंदर्य कमाल
Advertisement

                       पंढरीत सावळ्या विठुरायाचे थंडीत राजसी पोशाख

Advertisement


पंढरपूर
: विठोबा रखुमाईस प्रक्षाळ पूजेपासून रोज रात्री तसेच पहाटे उबदार कपड्यांचा पोशाख करण्यात येत आहे. पहाटेच्या नित्यपूजा वेळीच देवाला दोन हात करवती काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधून उबदार शाल पांघरण्यात येत आहे, तर शेजारतीनंतर रजई पांघरण्यात येत आहे.

रुक्मिणी मातेलाही उबदार शाल पांघरण्यात येत आहे, हा पोशाख बंडी संपेपर्यंत राहणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र राऊत यांनी दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा थाटच न्यारा आहे. कारण ऋतुमानाप्रमाणे सावळ्या विठ्ठल आणि रखुमाईला वेगवेगळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे.

Advertisement

एवढेच नव्हे तर ऋतुमानाप्रमाणे त्यांच्या खानपानाची देखील व्यवस्था असून ऋतुमानाला योग्य होईल, असे पदार्थ नैवेद्यामध्ये त्यांना दाख्खले जात असतात. त्यामुळे गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाचा बाट मोठा आहे.

सध्या थंडीचा मोसम सुरू झाल्यामुळे पहाटेच्या थंडीत विठुरायाला उबदार कपड्यांचा पोशाख करण्यात येत आहे. दोन हात करवती काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधून उबदार शाल पांघरण्यात येत आहे, तर रात्री शेजारतीनंतर राई पांघरण्यात येत आहे. त्यामुळे थंडीच्या उबदार वातावरणात राजस सुकुमार असलेल्या सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच लोभस असे भासत आहे.

Advertisement
Tags :

.