महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाचशे रुपयात बांबूची सायकल

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतात आजही गरीबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहन म्हणून सायकलला मोठी मागणी आहे. तथापि, सायकलच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक गरीबांना सायकल घेणेही अशक्य असते. अशा लोकांची लवकरच मोठी सोय होणार आहे. कारण बिहारच्या एका तंत्रज्ञ युवकाने बांबूची सायकल निर्माण केली असून तिची किंमत अवघी 500 रुपये ठेवण्यात आली आहे. अमरेश कुशवाह नामक व्यक्तीने या सायकलची माहिती इंटरनेटवर पोस्ट केली आहे. ती नेमकी कोणी बनविली आहे, हे स्पष्ट नाही. तथापि, ती चालविता येते आणि तिचा आकार सायकलसारखाच आहे हे दिसून येते. या सायकलला टायर आणि ट्यूब रबरीच आहेत. पण उरलेली रचना बांबूपासून केलेली आहे.

Advertisement

ही सायकल 15 ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, लोकांनी अनेक आक्षेपही नोंदविले आहे. या सायकलला ब्रेक दिसत नाहीत, असे काही जणांचे म्हणणे आहे. तर सायकल केवळ 500 रुपयांना मिळू शकते यावर अनेकांचा विश्वास नाही. पाचशे रुपयांमध्ये सायकलचे टायर-ट्यूबही येत नाहीत. बाजारात आज साध्या सायकलची किंमत बाजारात 8 हजार रुपयांहून अधिक आहे. अशा स्थितीत ही बांबूची सायकल 500 रुपयाला मिळते हा चमत्कारच म्हटला पाहिजे अशीही टिप्पणी काही जणांनी केली आहे. तर काहींनी या सायकलच्या टिकावूपणाविषयी शंका व्यक्त केली असून तिची दुरुस्ती करायची वेळ आली तर कोण करणार, तसेच सुटे भाग कसे उपलब्ध होणार असेही रास्त प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्थातच, सर्व शंकांची उत्तरे त्वरित मिळणार नाहीत. पण एक अतिशय चांगला प्रयत्न म्हणून प्रोत्साहन द्यावयास हवे असे काहींना वाटते. कालांतराने या सायकलमध्ये सुधारणा होऊ शकेल. तसेच प्रथम प्रयोगांमध्ये असे होतच असते. या सायकलचा व्हिडीओ 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article