टक्कल असणारे माकड
टक्कल असणारे उकारी हे छोट्या माकडांमध्ये उकारीच्या चार प्रजातींपैकी एक आहे. हे केवळ ऑस्ट्रेलिया आणि पेरूच्या पश्चिम अमेझॉनच्या वरजिय जंगलात आढळून येतात. या माकडांना केसरहित डोक आणि चेहऱ्यामुळे त्वरित ओळखता येते. त्यांचा चेहरा चमकणाऱ्या लाल रंगाचा असतो. त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांना अत्यंत कमी माहिती असते.
पाहण्यास हे माकड अत्यंत वेगळ्याप्रकारे दिसते. त्यांचा चेहरा पाहिल्यास केसांदरम्यान लाल रंगाचा मुखवटा असल्याचे वाटते. या माकडांची उंची केवळ 45 सेंटीमीर आणि वजन केवळ 3 किलोपर्यंत असते. ही माकडं केवळ झाडावरच झोपणे पसंत करतात आणि जंगलात वृक्षांदरम्यान उड्या घेत दूरपर्यंत भोजनाच्या शोधात जातात. हे माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडादरम्यान 20 मीटरपर्यंतची उडी घेऊ शकतात.
जगात अनेक ठिकाणी लाल तोंडाची माकडं असतात, परंतु टक्कल असणारी उकारी काहीसे वेगळेच आहे. त्यांच्या चेहऱ्याचा लाल रंगच त्यांना वेगळी ओळख प्रदान करतो. लाल रंग या माकडांच्या उत्तम आरोग्याची खुण असल्याचे आढळून आले आहे. या माकडांच्या चेहऱ्यावर किंचित पिवळा रंग दिसल्यास तो आजाराची खुण मानला जातो. त्यांच्या अधिवासात मलेरियासारखे आजार सामान्य असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर पिवळेपणा येतो.
उकारी माकड सहकाऱ्याच्या निवडीसाठी चेहऱ्यावरील लाल रंगाचा निकष वापरत असतो. नर उकारीमध्sय टेस्टो रोन तर मादी उकारीत एस्ट्रोजन हार्मोनचा लाल रंगाशी संबंध असतो. अशा स्थितीत रंगाचा प्रजननासाठी सहकाऱ्याच्या निवडीत योगदान असते. यशस्वी जोडी तयार करणे याचा अर्थ आरोग्यदायी पिल्लांना जन्म देणे असतो.
माकडांचे वैशिष्ट्या म्हणजे यांचे शेपूट लांब असते. परंतु टक्कल असलेल्या उकारी माकडांची शेपूट छोटी असते, जी जवळपास 15 सेंटीमीटरच्या आसपास असते. ही माकडं स्वत:च्या शेपटाचा वापर करू शकत नाहीत. शेपटीच्या एwवजी ते स्वत:च्या मजबूत आणि लांब हात आणि पायांवर भरवसा करतात. उकारी माकडं ही अत्यंत चपळ असतात.
उकारी माकडांचे चेहरे अत्यंत भावपूर्ण असतात. त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळया प्रकारचे भाव दिसून येतात. यात संताप आणि आनंद देखील सामील आहे. संतापात त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदललेला दिसू येतो. तर त्यांचे जबडे अत्यंत मजबूत असतात.