महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोलंबसशी संबंधित 500 वर्षे जुन्या रहस्याची उकल

06:01 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्यू असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट : 21 वर्षांपूर्वी स्पेनमध्ये मिळाले होते अवशेष

Advertisement

अमेरिकेचा शोध लावणाऱ्या कोलंबसशी संबंधित 500 वर्षे जुन्या रहस्याची उकल झाली आहे. स्पेनच्या कॅथेड्रल ऑफ सेविलेमध्ये 2003 साली मिळालेले मानवी अवशेष कोलंबसचेच होते.  स्पेनचे फॉरेन्सिक सायंटिस्ट मिगेल  लॉरेंटे आणि इतिहासकार मार्शिअल कॅस्ट्रो यांनी याची माहिती दिली आहे. तसेच कोलंबस पश्चिम युरोपचा सेफार्डिक ज्यू होता असे त्यांनी सांगितले होते.  वैज्ञानिकांनी डीएनए विश्लेषणानंतर यासंबंधीची पुष्टी दिली आहे.

Advertisement

कोलंबसचा मृत्यू 1506 साली झाला होत. हिस्पॅनिओला बेटावर दफन करण्यात यावी अशी त्याची इच्छा होती. याचमुळे त्याचे शरीर 1542 मध्ये तेथे नेण्यात आले होते. यानंतर 1795 मध्ये अवशेष क्यूबा येथे नेण्यात आले आणि अखेरीस 1898 मध्ये स्पेनच्या सेविलेमध्ये त्याचा शव दफन करण्यात आला. अनेक ठिकाणी शव नेण्यात आल्याने कोलंबस अखेरच्या काळात कुठे राहत होता हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे संशोधन शक्य झाले. कॅथेड्रल ऑफ सेविले मकबऱ्याला कोलंबसच्या अखेरच्या विश्रामाच्या स्वरुपात ओळखले जाते. फॉरेन्सिक सायंटिस्ट मिगेल लॉरेंटे आणि इतिहासकार मार्शिअल कॅस्ट्रो यांनी 2003 मध्ये तेथे काही मानवी अवशेष शोधले होते. तेव्हापासून या अवशेषांवरून संशोधन केले जात राहिले आहे.

2003 मध्ये डीएनए विश्लेषण इतके प्रगत नव्हते. सध्याच्या आधुनि तंत्रज्ञानामुळे सेविलेमध्ये मिळालेले मानवी अवशेष कोलंबसचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोलंबस आणि त्याच्या मुलाच्या डीएनएचे संशोधन करण्यात आले. आमच्याकडे कोलंबसचा डीएनए नमुना होता. याचबरोबर कोलंबसचा पुत्र हर्नान्डो कोलोनच्या डीएनए नमुन्याद्वारे हे संशोधन केले. हर्नान्डोच्या डीएनएमध्ये ज्यू मूळाची लक्षणे आहेत असे मिगेल लॉरेंटे यांनी सांगितले.

कॅथोलिक शासक इसाबेला आणि फर्डिनेंड यांनी ज्यू आणि मुस्लिमांना कॅथोलिक धर्म स्वीकारण्याचा किंवा देश सोडण्याचा आदेश दिला होता. त्यापूर्वी स्पेनमध्ये सुमारे 3 लाख ज्यू राहत होते. कोलंबसचे जहाज 2014 मध्ये सापडले होते. त्यापूर्वी हे जहाज सांटा मारिया हैतीच्या समुद्र किनाऱ्यावर मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचे हे जहाज सुमारे 500 वर्षे जुने आहे.

अमेरिकेतील शोधकर्ते बॅरी क्लिफोर्ड यांन या जहाजावर 11 वर्षे संशोधन केले होते. याच जहाजाने मार्ग बदलल्याने अमेरिकेचा शोध लागला होता असा दावा त्यांनी केला आहे. त्यापूर्वी क्लिफोर्ड आणि त्यांच्या टीमने 2003 साली खोल समुद्रात जहाजाची तोफ शोधली होती. त्यावर संशोधन केल्यावर ती तोफ कोलंबसच्या काळात वापरली जात होती असे आढळून आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article