महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

29 वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे

06:45 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळुरातील घटनेमुळे खळबळ : पोलिसांकडून आरोपीचा शोध जारी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

दिल्लीतील श्रद्धा वालकर खुनाप्रमाणेच बेंगळुरात 29 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. महिलेच्या शरीराचे 25 हून अधिक तुकडे करून फ्रिजमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येमागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बेंगळूरच्या वय्यालिकावल पोलीस स्थानक हद्दीतील पाईपलाईन रोड परिसरात ही घटना घडली आहे. महालक्ष्मी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीने महिलेची हत्या करून मृतदेहाचे 25 हून अधिक तुकडे फ्रिजमध्ये लपविले. 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंध येत असल्याने त्यांनी महिलेच्या नातेवाईकांना माहिती दिली. शनिवारी नातेवाईकांनी कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आली.

महालक्ष्मी परराज्यातील असून पतीपासून विभक्त होऊन मागील दोन-तीन महिन्यांपासून एकटीच भाडोत्री घरात वास्तव्यास होती. एका मॉलमध्ये ती कामाला होती, असे सांगण्यात आले आहे. तिची ने-आण करणाऱ्या युवकानेच हत्या केली असावी, असा संशय आहे. घटनास्थळी वय्यालिकावल पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत आरोपी अफताब पुनावाला याने लिव्ह इन मैत्रिण श्रद्धा वालकर हिची हत्या करून मृतदेहाचे 35 तुकडे केले. नंतर दक्षिण दिल्लीच्या मेहरौली येथील निवासस्थानी तीन आठवडे फ्रिजमध्ये ठेवले होते. दररोज मृतदेहाचे एकेक तुकडे तो विविध ठिकाणी फेकून देत होता. या घटनेने देशभरात खळबळ माजली होती. बेंगळुरातही अशीच घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article