Karad News : कराड शंभूतीर्थवर 25 फुटांचा संभाजी महाराजांचा पुतळा लवकरच प्रतिष्ठापित होणार
कराड शंभूतीर्थ भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार
कराड : येथील शंभूतीर्थवर प्रतिष्ठापित करण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फुटी पुतळा मंगळवारी सायंकाळी येथे आणण्यात आला. हा भव्य पुतळा पाहण्यासाठी शिवशंभूप्रेमी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक सचिव रणजीत पाटील कराडमध्ये शंभूतीर्थवर नागरिकांची गर्दी नाना व समिती सदस्य तसेच कराडकर नागरिकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून शंभूतीर्थबर संभाजी महाराजाचे स्मारक साकारण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मिळवला होता.
या निधीतून स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे आहे. स्मारकात बसवण्यात येणारा पुतळा २५ फुटी असून समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा बनवण्याचे काम कोल्हापूर येथील आर्ट अॅफेनिटी स्टुडिओचे संजीव संकपाळ व अतुल डाके यांना दिले होते. त्यांनी गेली दोन वर्ष परिश्रम घेऊन अभ्यासपूर्वक हा पुतळा साकारला आहे.
या पुतळ्याची माहिती देताना शिल्पकार संजीव संकपाळ व अतुल डाके म्हणाले की, हा पुतळा बनवण्यास दोन वर्ष लागली. हा पुतळा सुमारे ५००० किलोचा आहे. पुतळा बनवताना महाराजांचे वय आणि शौर्य त्यातून दिसावे, यासाठी शंभू प्रतिमांचा अभ्यास केला. आम्ही एकूण पंधरा जणांच्या टीमने यासाठी मेहनत घेतली आहे. बनवून परवानगी घेतली.
त्यानंतर डाय टाकून, कास्टींग करून व त्यानंतर ब्रांझचा पुतळा बनवण्यात आला. हा पुतळा स्मारकातील उंच चबुतऱ्यावर बसवण्यात येणार आहे. त्यासाठीची किरकोळ कामे पूर्ण करून पुतळा लवकरच बसवण्यात येणार आहे.
स्मारकात वस्तू संग्रहालय, संभाजी महाराजांची म्युरल्स, अॅम्पी थिएटर, अभ्यासिका पुतळ्यासमोर पाण्याचे कुंड आणि पायऱ्या असणार आहेत. तेथे पाण्यात पुतळ्याची प्रतिमा दिसणार आहे.
स्मारक परिसर भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे. प्रथम मातीचा पुतळा त्यास शासनाची असणार आहे. महाराष्ट्रात असे स्मारक अन्यत्र नाही. हे शिल्प बनवण्याचे भाग्य लाभले, हे आम्ही भाग्य समजतो, असे ते म्हणाले.