महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चीनची 17 वर्षीय बास्केटबॉलपटू झाली व्हायरल

06:16 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुलीची उंची पाहून लोक अचंबित

Advertisement

चीनच्या बास्केटबॉल संघाची सदस्य 17 वर्षीय झांग जीयू सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत आहे. झांगने एफआयबीए यु18 वुमेन एशिया कपमध्ये मोठी लोकप्रियता मिळविली आहे. यामागील कारण तिची कामगिरी नसून उंची आहे. 7 फूट 3 इंच उंच झांगने एका देशाच्या संघाच्या विरोधात चांगली कामगिरी केली होती.

Advertisement

या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात झांग स्वत:च्या उंचीचा लाभ घेत खेळाचे चित्र पालटताना दिसून येते. झांगला स्वत:ची पहिली बकेट प्राप्त करण्यासाठी फार घाम गाळावा लागला नसल्याचे या व्हिडिओच्या कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे.

इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशनने सामन्यामधील झांगच्या कामगिरीचे काही हिस्से दाखविणारा व्हिडिओ जारी केला आहे. यात झांग ही विरोधी संघाच्या सदस्यांपेक्षा खूपच उंच दिसून येत आहे. तिच्या संघाचे अन्य सदस्य झांगला बॉल पास करतात आणि ती सहजपणे बास्केटमध्ये बॉल टाकत असल्याचे यात दिसून येते.

एक्सवरील बास्केटबॉल पेज नेक्स्टजेन हूप्सने तिला ‘चीट कोड’ नाव दिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत कोट्यावधी ह्यूज मिळाल्या आहेत. झांगला ‘फिमेल याओ मिंग’ या नावाने ओळखले जाते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article