For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोपेत घोरणाऱ्यांना मिळणार पैसे

06:11 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
झोपेत घोरणाऱ्यांना मिळणार पैसे
Advertisement

आकारला जाणार नाही कर

Advertisement

कुणासाठी घोरण्याची समस्या पैसे मिळवून देऊ शकते का? एकेठिकाणी तुम्ही झोपेत घोरत असाल तर दर महिन्याला 78 हजार रुपये मिळू शकतात. ही सुविधा ब्रिटनच्या डिपार्टमेंट ऑफ वर्क अॅट पेन्शन्सकडून (डीडब्ल्यूपी) तेथील घोरण्याची गंभीर समस्या असलेल्या लोकांना दिली जात आहे. ही सुविधा कमी वयाचे लोक देखील प्राप्त करू शकतात आणि ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असणार आहे.

घोरण्याला अनेकदा छोटीसी समस्या मानून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे कधीकधी स्लीप एपनिया नावाच्या अधिक गंभीर स्थितीत रुपांतरित होऊ शकते, जे तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेला मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकते. दैनंदिन जीवनावर याच्या नकारात्मक प्रभावामुळे याला दिव्यांगत्वाच्या स्वरुपात ओळखले जाते. खराब झोपेच्या गुणवत्तेमुळे अत्याधिक थकव्याच्या अनुभवासोबत ही स्थिती अनेकदा अन्य आरोग्य समस्यांनाही जन्म देऊ शकते. 

Advertisement

या स्थितीने पीडित लोक व्यक्तिगत स्वातंत्र्य पेमेंट (पीआयपी)साठी पात्र ठरू शकतात. जर तुमच्या घोरण्याची सवय तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल प्रभाव पाडत असेल तर उपचार करवून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वात सामान्य प्रकाराला ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसपी) म्हटले जाते. एनएचएस स्लीप एपनियाच्या उपचाराच्या महत्त्वावर जोर देते.

जर दीर्घकाळापासून शारीरिक किंवा मानसिक आरोग्य स्थिती असल्यास हा आर्थिक लाभ जीवनातील वाढत्या खर्चांमध्ये मदत करू शकतो. पीआयपी तुम्ही काम करत असाल तरच उपलब्ध आहे. पीआयपीवर कुठल्याही प्रकारचा कर आकारण्यात येत नाही तसेच तुम्हाला मिळणारी रक्कम तुमचे उत्पन्न आणि बचतीने प्रभावित होत नाही. या आर्थिक लाभासाठी संबंधिताचे वय 16 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच संबंधिताला दीर्घकाळापासून शारीरिक किंवा मानसिक आरोग्य स्थिती असावी.

Advertisement
Tags :

.