कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

1600 वर्षांपूर्वीचा खजिन्याने भरलेला मकबरा

06:46 AM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दक्षिण अमेरिकेतील देश बेलीजच्या जंगलात मिळालेल्या मकबऱ्याने जगाला चकित केले आहे. हा मकबरा सुमारे 350 सालचा असल्याचे मानले जात आहे. बेलीज या देशातील जंगलांमध्ये मिळालेल्या या रहस्यमय संस्कृतीने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. पुरातत्व तज्ञांनी प्राचीन माया नगरी काराकोलमध्ये पहिल्या शासकाचा भव्य मकबरा शोधून काढला आहे. या शासकाने सुमारे 1600 वर्षांपुर्वी प्राचीन शहराचा पाया रचला होता, या शासकाचे नाव कआब चाक होते.

Advertisement

Advertisement

ह्यूस्टन युनिव्हर्सिटीचे पुरातत्व तज्ञ डायने चेस आणि अर्लेन चेस यांच्याकडून 40 वर्षांपूर्वी येथे उत्खनन सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून पहिल्यांदाच पॅराकोलमध्ये ओळख पटविण्यायोग्य शाही मकबरा मिळाला आहे. कआब चाक काराकोलच्या सिंहासनावर ईसवी सन 331 मध्ये आरुढ झाला होता आणि हा मकबरा ईसवी सन 350 मधील असल्याचे मानले जात आहे.

मकबऱ्यात मिळालेल्या सामग्री शाही जीवनाची भव्य झलक दर्शविणाऱ्या आहेत. शाही मकबऱ्यात मातीची भांडी, नक्षीदार हाडं, सागरी संपत्ती, ट्यूबलर जेड मोती अणि जेडने निर्मित मोजेक डेथ मास्कही मिळाले आहेत. एका पात्रावर माया शासकाला भाला हातात धरलेल्या स्थितीत दर्शविण्यात आले आहे.

काराकोल हे शहर 6 व्या आणि 7 व्या शतकात माया जगताचे प्रमुख केंद्र होते. कधी काळी हे शहर 1 लाखाहून अधिक लोकांचे वस्तीस्थान होते. परंतु ईसवी सन 900 पर्यंत रहस्यमय पद्धतीने हे शहर हरवत गेले. याचे अवशेष आता बेलीजच्या कायो जिल्ह्यातील पर्वतीय जंगलांमध्ये आढळून येतात.

हे शहर 68 चौरस मैलापेक्षा अधिक भूभागात फैलावलेले होते, जेथे विशाल रस्ते, भव्य भवन आणि 140 फूट उंच काना पिरॅमिडसारख्या संरचना अस्तित्वात होत्या, आजही बेलीजच्या सर्वात उंच इमारतींपैकी ही एक आहे.

2011 मध्ये येथे आढळून आलेल्या काही ओब्सीडियन ब्लेड्स आणि अन्य कलाकृती मेक्सिकोच्या तेओतिहुआकान शहराचा प्रभाव दर्शवितात. मेसोअमेरिकेच्या या दोन्ही क्षेत्रांचे शासक केवळ परस्परांच्या धार्मिक परंपरांबद्दल जाणून नव्हते तर कूटनीतिक संबंधही बाळगून होते असे प्राध्यापक अर्लन चेस यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article