14 वर्षीय मुलाने निर्माण केला देश
स्वत:चा झाला अध्यक्ष, झेंडाही तयार
14 वर्षीय मुलगा शिक्षणात पहिला येऊ शकतो. परंतु तो जर क्रिएटिव्ह झाला तर काहीतरी नवे निर्माण करू शकतो. पण या वयात कुणी स्वत:चा देश निर्माण करून तो चालवू शकतो का असा विचार कुणीच केलेला नसेल. सर्वसाधारणपणे ज्या वयात मुले स्वत:च्या भविष्याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, त्या वयात एक मुलगा पूर्ण देश सांभाळत आहे. या मुलाचे नाव डॅनियल जॅकसन असून त्याने 2019 मध्ये काही लोकांसोबत मिळून एका देशाची स्थापना केली आहे. तसेच तो या देशाचा अध्यक्ष झाला आहे.
रिवर दैनबुनजीक द फ्री रिपब्लिक ऑफ वर्डीज नावाचा एक स्वयंघोषित देश आहे. या देशाचा अध्यक्ष डॅनियल जॅकसन आहे. त्याने वयाच्या 14 व्या वर्षी काही लोकांसोबत मिळून या देशाची स्थापना केली, कारण त्या जागेवर कुणीच कब्जा केला नव्हता. याच लोकांनी डॅनियलची द फ्री रिपब्लिक ऑफ वर्डीज नावाच्या या मायक्रोनेशनच्या अध्यक्षपदी निवड केली. या देशात जाण्यासाठी केवळ एकच मार्ग असून तो 5 मैलापर्यंत नौकेतून प्रवास केल्यावरच उपलब्ध होतो.
डॅनियल जॅकसनच्या या देशाने युक्रेनला युद्धादरम्यान मदत देखील पोहोचविली आहे. आतापर्यंत 400 लोकांनी या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे आणि 15 हजार लोकांनी याकरता उत्सुकता दर्शविली आहे. या देशात पायाभूत सुविधांच्या नावावर अद्याप काहीच नाही. डॅनियलच्या देशाला शेजारी क्रोएशियापासून धोका आहे. क्रोएशियावर रशियाचा मोठा प्रभाव आहे. यामुळे डॅनियलच्या देशासमोर अघोषित युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.