मतदार उजळणी अंतर्गत 95 टक्के अर्ज प्राप्त
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात हाती घेण्यात आलेल्या मतदारांच्या (एसआयआर प्रक्रियेत) विशेष दक्षता उजळणी अंतर्गत आतापर्यंत एकूण 11,29,773 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे उजळणीचे हे काम सुमारे 95.34 टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे.
राज्यातील मतदारांच्या सक्रिय सहभागामुळे हे काम पूर्ण करणे शक्य झाले असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे. राज्याची विद्यमान लोकसंख्या 11,85,034 एवढी असून त्यापैकी 11,29,773 गणना अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. ही संख्या सुमारे 95.34 टक्के एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे,
येत्या दि. 4 डिसेंबरपर्यंत हे गणना अर्ज सादर करता येणार आहेत. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज सादर केले नाहीत त्यांनी ते त्वरित सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. हे गणना अर्ज निवडणूक आयोगाच्या पोर्टलद्वारेही मतदार ऑनलाईन सादर करू शकतात, अशी माहिती आयोगाच्या कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.