महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आंध्र-तामिळनाडूला केंद्राकडून तत्काळ 944 कोटींची मदत

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या चक्रीवादळग्रस्त राज्यांना केंद्राच्या योगदानाचा दुसरा हप्ता आगाऊ जारी करण्याचे निर्देश गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्रालयाला दिले. आंध्रप्रदेशला 493.60 ऊपये आणि तामिळनाडूला 450 कोटी ऊपये याप्रमाणे एकंदर 944 कोटी रुपये हस्तांतरित केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना समान रकमेचा पहिला हप्ता आधीच जारी केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) अंतर्गत ‘चेन्नई बेसिन प्रकल्पासाठी एकात्मिक शहरी पूर व्यवस्थापन उपक्रमां’साठी 561.29 कोटी ऊपयांच्या पहिल्या शहरी पूर शमन प्रकल्पालाही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात केंद्राचाही समावेश आहे. तीव्र चक्रीवादळ मिचैंगचा तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशला जबर फटका बसला आहे. नुकसानीचे प्रमाण वेगवेगळे असले तरी, या राज्यांतील अनेक भागात पाणी भरल्यामुळे उभ्या पिकांची प्रचंड नासधूस झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article