सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीत 92 उमेदवार रिंगणात
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी 86 उमेदवार मिळून 92 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भरलेल्या सहाही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले तर नगरसेवक पदासाठी भरलेल्या 94 उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगरसेवक पदासाठी 86 उमेदवार रिंगणात राहिले आहेत . महायुती, महाविकास आघाडी होण्याची चिन्हे आता संपल्याने सावंतवाडी नगरपरिषदेत आता चौरंगी लढत होणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस अशी लढाई असणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगरसेवक पदासाठी पाच उमेदवार कायम ठेवले आहेत .नगराध्यक्ष पदासाठी भाजप तर्फे श्रद्धाराजे भोसले, शिवसेना शिंदे गटातर्फे नीता सावंत - कविटकर ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने तर्फे सीमा मठकर, काँग्रेस तर्फे साक्षी वंजारी आणि अन्नपूर्णा कोरगावकर व निषाद बुराण या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या रिंगणातून माजी नगरसेवक नासिर शेख ,अर्चित पोकळे, गौरव जाधव ,नासिर पटेल, जावेद अबूबकर शहा ,अस्मिता परब ,शबाब शेख ,राधिका चितारी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. नगरसेवक पदासाठी 94 उमेदवार रिंगणात होते . त्यापैकी 17 अपक्ष उमेदवार होते. त्यापैकी आठ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले . आता माजी नगरसेवक सुरेश भोगटे, समी उल्ला खान , प्रसाद नाईक , ऋग्वेद सावंत , बबलू मिशाळ ,आशुतोष हेळेकर, हरीश पोटेकर , लतिका सिंग ,फरलाद बागवान हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग एकमधून अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजप , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्ष सर्व 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत . काँग्रेसच्या नगराध्यक्षसह सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत सावंतवाडी नगर परिषदे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 21 नोव्हेंबरला केवळ नगरसेवक पदासाठीच्या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगरसेवक पदासाठी 84 तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार मिळून 92 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.