For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

900 वर्षे जुना अनोखा नकाशा

06:48 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
900 वर्षे जुना अनोखा नकाशा
Advertisement

पूर्ण जग सामावलेलेले, अनेक रहस्य दडलेली

Advertisement

जुन्या काळापासूनच जगाच्या भौगोलिक माहितीसाठी नकाशे तयार केले जात आहेत. परंतु बागपतमध्ये एक असा अनोखा नकाशा आहे, ज्याला जगात अनोखे मानले जाते. अशाप्रकारचे नकाशे जगात केवळ दोनच असून यातील एक भारतात तर दुसरा ब्रिटनच्या संग्रहालयात आहे.

नैसर्गिक रंगांचा वापर करून हा नकाशा तयार करण्यात आला आहे. या अडीच बेटात पूर्ण जग दर्शविण्यात आले आहे. या नकाशात नदी, पर्वत आणि अन्य नैसर्गिक स्थळांना देखील नैसर्गिक रंगांद्वारे दर्शविण्यात आले आहे. ‘अढाई द्वीप’ नावाने पूर्ण जगाचा हा नकाशा आहे. हा नकाशा 12 व्या-13 व्या शतकादरम्यान तयार करण्यात आला होता. हा नकाशा कापडावर तयार करण्यात आला असून याच्या निर्मितीत पूर्णपणे नैसर्गिक रंग वापरण्यात आले आहेत. त्या काळातील वृक्ष, फळे आणि भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या या रंगांचा केलेला वापर पाहता भारताच्या चित्रकला शैलीचे एक अनोखे उदाहरण प्राप्त होते.

Advertisement

अद्वितीय चित्रण

या नकाशात भौगोलिक आणि खगोलीय घटनांचे अद्वितीय चित्रण करण्यात आले आहे. यात नद्या, पर्वत, समुद्र आणि अन्य भौगोलिक स्थळांच्या स्थितीला बारकाईने दर्शविण्यात आले आहे. भारताबाहेरच्या भारतीय दर्शनांवर काम करणारे इतिहासकार आणि संशोधक या नकाशाचे अध्ययन करू पाहत आहेत. या नकाशात दडलेल्या रहस्यांची उकल करणे आणि ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.

दुर्लभ नकाशा ब्रिटिश संग्रहालयात

या नकाशाच्या माध्यमातून भारताचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृतीला जगासमोर आणण्याची अनोखी संधी मिळेल असे इतिहासकारांचे मानणे आहे. हा नकाशा दुर्लभ श्रेणीत समाविष्ट केला जाऊ शकतो. संबंधित कालखंडातील  अन्य एक नकाशा ब्रिटिश संग्रहालयात आहे. लंडन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक याचे तुलनात्मक अध्ययन करत आहेत.

Advertisement
Tags :

.