For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटच्या दिवशी शेअरबाजार घसरणीसोबत बंद

06:45 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेवटच्या दिवशी शेअरबाजार घसरणीसोबत बंद
Advertisement

सेन्सेक्स 71 अंकांनी घसरला,  विक्रीच्या दबावाचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

गुरुवारी विक्रमी स्तरावर भारतीय शेअर बाजार बंद झाला होता. मात्र शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजार काहीसा घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 71 अंकांनी नुकसानीत होता.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 71 अंक घसरत 82890 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 32 अंकांनी घसरुन 25356 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्स निर्देशांकात 30 पैकी 19 समभाग घसरणीसह बंद झाले. तर 11 समभाग तेजीसोबत बंद झाले. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकात 50 पैकी 32 समभाग घसरणीसोबत आणि 18 तेजीसमवेत बंद झाले. ऑईल आणि गॅस तसेच हेल्थ केअर क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री पहायला मिळाली. शेअर बाजारात आयटीसी, रिलायन्स, भारती एअरटेल आणि इन्फोसिस यांनी नकारात्मक कामगिरी नोंदवली. तर बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते.

आशियातील बाजारामध्ये काहीसा दबाव दिसून आला. निक्केई 0.68 टक्के घसरणीत होता. तर या उलट कोरियाचा कोस्पी 0.13 टक्के तेजीसोबत कार्यरत होता. चीनचा शांघाय कंपोझिट 0.48 टक्के घसरणीत होता. तर हाँगकाँगचा हेंगसेंग 0.75 टक्के तेजीत कार्यरत होता. 12 सप्टेंबरला अमेरिकेतील डो जोन्स निर्देशांक 0.58 टक्के वाढत 41096 अंकांवर बंद झाला होता. नॅसडॅकही तेजीसोबत बंद झाला. 12 सप्टेंबरला विदेशी गुंतवणूकदारांनी 7695 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1800 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले. वेस्टर्न कॅरियर्सचा आयपीओ शुक्रवारी गुंतवणुकीसाठी खुला झाला असून यामध्ये 18 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार. 12 सप्टेंबरला सेन्सेक्सने 83116 आणि निफ्टीनेही 25433 या नव्या सर्वकालीक उच्चांकावर झेप घेतलेली होती. सेन्सेक्स निर्देशांक शुक्रवारी 1439 अंकांनी वाढत बंद झाला होता.

हे समभाग वधारले

आयटी कंपनी विप्रो, इंडसइंड बँक, पोलाद क्षेत्रातील कंपनी टाटा स्टील, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, सिप्ला, एचसीएल टेक्नॉलॉजी, टायटन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले.

हे समभाग घसरले

जेएसडब्ल्यू स्टील, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, ओएनजीसी, अदानी पोर्टस, भारती एअरटेल, एशियन पेंटस, कोल इंडिया, आयटीसी, एनटीपीसी, आयशर मोटर्स आणि अपोलो हॉस्पिटल यांचे समभाग घसरणीसह बंद झाले होते.

Advertisement
Tags :

.