महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कणकुंबी भागासह तालुक्यातील 90 टक्के वीजपुरवठा सुरळीत

10:36 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सलग 12 दिवस अंधारात असलेल्या भागात हेस्कॉमच्या अधिकारी कल्पना तिरवीर यांचे शर्थीचे प्रयत्न

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

मागील आठ-पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कणकुंबी-जांबोटी भाग सलग दहा ते बारा दिवसांपासून अंधारात होता. वैतागलेल्या नागरिकांनी खानापूर हेस्कॉम खाते बेजबाबदार असल्याचा आरोप करून निषेध केला. मात्र खानापूर हेस्कॉम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी मंगळवारी रात्री स्वत: दहा ते अकरा वाजेपर्यंत उभे राहून कणकुंबी भागातील वीजपुरवठा सुरळीत केल्याने अधिकारी कल्पना तिरवीर यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. विशेषत: हेस्कॉमच्या खानापूर विभागीय कार्यकारी अभियंता म्हणून कल्पना तिरवीर या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. परंतु खानापूर तालुक्यातील बहुतांश भाग अंधारात असताना आपल्या जीवाची पर्वा न करता रात्री, अपरात्री फिरुन तिरवीर यांनी नागरगाळी भागासह कणकुंबी भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास कार्यतत्परता दाखवली. त्याबद्दल जनतेमध्ये समाधान पसरले आहे

गेले दहा-बारा दिवस कालमणीपासून ते कणकुंबी, चोर्लापर्यंतची पुढील पंधरा-वीस गावे पूर्णपणे अंधारात होती. तसेच तालुक्यातील बहुतांश भागात देखील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युतखांब मोडून पडले तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास हेस्कॉमला कसरत करावी लागली. खानापूर तालुक्यातील वीजवाहिन्या जंगलमय भागातून गेलेल्या असल्यामुळे हेस्कॉमला पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. वनखात्याचाही अडसर असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषत: कणकुंबी भागातील विद्युतपुरवठा सुरळीत करण्यास खानापूर हेस्कॉम खात्याला अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कणकुंबी भागातील चोर्ला, हुळंद, माण, सडा, आमगाव आदी गावांमध्ये सलग दहा-पंधरा दिवस वीज गायबच असते. त्यामुळे नागरिकांना विजेअभावी जीवन जगणे मुश्किल होते.

 अभियंत्या तिरवीर यांची कार्यतत्परता 

खानापूर तालुक्यातील बहुतांश भाग अंधारात होता. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तिरवीर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत खात्याची फार मोठी हानी झाली. जवळपास 274 विद्युतखांब, 23 विद्युत ट्रान्स्फॉर्मर व 22 कि. मी. लांबीच्या विद्युत वाहिनींचे नुकसान झाले आहे. पहिल्यांदा खानापूर शहर आणि परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर मंगळवारी नागरगाळी, कृष्णानगर, बामणीकोप्प, कुंभार्डा, चिंचेवाडी, सुवातवाडी, मुंडवाड, सायंकाळी माचाळी, मांजरपै, मोहीशेत, दुधवाळ, वरकडपाट्यो, हणबरवाडा, अस्टोळी, कुरदवाड, लोहारवाडा, गावडेवाडा, अक्राळी, राजवाळ, गवळीवाडा, गवेगाळी, दारोळी, अबनाळी व कांजळे आदी 21 गावांचा विद्युतपुरवठा सुरळीत केला. यापैकी कांजळे गावचा विद्युतपुरवठा बुधवारी सुरू होणार आहे. त्यानंतर जांबोटी भागातील कालमणीसह कणकुंबी, चिगुळे, पारवाडपर्यंतचा वीजपुरवठा सुरळीत केला. फक्त चोर्ला, माण, हुळंद, सडा आदी गावांतील विजेची समस्या दोन दिवसांत सुरळीत वीजपुरवठा केला जाईल, असे तिरवीर यांनी सांगितले. कणकुंबीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कल्पना तिरवीर यांनी व सहकाऱ्यांना रात्री दहा वाजले. त्यानंतर त्यांनी खानापूरला प्रस्थान केले. त्यामुळे कणकुंबी भागातील नागरिकांकडून अधिकारी तिरवीर यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

जांबोटी-कणकुंबी भागात भूमिगत वीजवाहिन्यांची गरज  

यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता कल्पना तिरवीर यांना जांबोटी, कणकुंबी या जंगलमय भागांमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांशिवाय या भागातील विद्युतपुरवठा सुरळीत होणार नाही. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. या जंगलमय भागात भूमिगत वीज वाहिन्यांची गरज आहे. आपण कोणती उपाययोजना करू शकता, असे विचारले असता, कल्पना तिरवीर यांनी, आपण सरकारकडे भूमिगत वीजवाहिन्या संदर्भात प्रस्ताव पाठवणार असून सरकार दरबारी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून याची पूर्तता केली तर ही समस्या कायमची मिटू शकते, असे त्यांनी ‘तरुण भारतशी’ बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article