महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टेक्सासमध्ये भगवान हनुमानाची 90 फूट उंच मूर्ती

06:25 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ह्यूस्टन

Advertisement

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ह्यूस्टनमध्ये भगवान हनुमानाच्या 90 फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली आहे. अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती ही असल्याचे सांगण्यात येत आहे. हनुमानाच्या या मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ असे नाव देण्यात आले आहे.

Advertisement

टेक्सासच्या शुगर लँड भागात असलेल्या श्री अष्टलक्ष्मी मंदिराच्या परिसरात ही मूर्ती उभारण्यात आली आहे. भगवान हनुमानाची मूर्ती निर्माण करणे आणि मंदिर परिसरात ती स्थापन करण्यामागे चिन्नाजीयार स्वामी यांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली आहे.

प्राणप्रतिष्ठेदरम्यान हेलिकॉप्टरमधून मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यादरम्यान  मोठ्या संख्येत हिंदू समुदायाचे सदस्य उपस्थित होते. स्टॅच्यू ऑफ युनिटीला अध्यात्माचे केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article