9 हजार वर्षांपूर्वी सहारा वाळवंटात होता समुद्र
प्राचीन गुहा चित्रांमुळे झाला खुलासा
इजिप्तच्या पश्चिम वाळवंटी भागात केव ऑफ स्वीमर्स म्हणजेच पोहणाऱ्यांची गुहा आहे. प्रत्यक्षात या गुहेत निर्माण करण्यात आलेल्या रॉक पेंटिंगमुळे ती प्रसिद्ध आहे. हे चित्र त्यावेळच्या जलतरणपटूंनी तयार केले होते. येथे अनेक चित्रे असली तरीही एक खास चित्र आहे, ज्यात दोन जण पोहताना दिसून येत आहेत.
हे चित्र 6-9 हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आले असावे असे मानले जाते. त्यावेळी सहारा वाळवंट म्हणजे समुद्र होता. तो कोरडा पडला नव्हता. तेथे केवळ वाळूच वाळू नव्हती, तर वृक्षसंपदा होती. प्रत्यक्षात हे चित्र सँडस्टोनने भरलेल्या गिल्फ कीबर पठारावर असलेल्या एका गुहेत आहे. हे पठार दक्षिण-पश्चिम इजिप्तपासून दक्षिणपूर्व लीबियापर्यंत फैलावलेले आहे.
येथे आणखी अनेक पुरावे सापडले आहेत, ज्याद्वारे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी हेते हे स्पष्ट झाले आहे. तेथे ओसाड भूमी नव्हती, त्या ठिकाणाचा शोध सर्वप्रथम 1926 मध्ये युरोपीय कार्टोग्राफ लास्लो अलमासी यांनी लावला होता. त्यांना या पठावर दोन गुहा दिसून आल्या होत्या आणि या गुहांमध्ये माणूस आणि प्राण्यांवर आधारित चित्रे काढण्यात आली होती. परंतु एकाच चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हे चित्र दोन पोहणाऱ्या माणसांचे होते. त्याबाबत अधिक अध्ययन करण्यात आले असता चित्र साकारण्यात आलेल्या कालावधीबद्दल कळले होते. त्या काळात सहारा वाळवंटात समुद्र होता किंवा पाण्याचे अनेक सारे स्रोत होते.
.