जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान
कोल्हापूर :
विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी शनिवार आणि रविवारी पोस्टल मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. दोन्ही दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हयातील एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभा निवडणूकीच्या प्रक्रियेसाठी अधिकारी -कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या अधिकारी -कर्मचाऱ्यासाठी 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी पोष्टल मतदान घेण्यात आले.त्याप्रमाणे दोन दिवसात एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान केले.
विधानसभा मतदारसंघनिहाय पोस्टल मतदान असे-
चंदगड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 140,
राधानगरी विधानसभा मतदारसंघात 1 हजार 109,
कागल विधानसभा मतदारसंघात 966,
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1 हजार 45,
करवीर विधानसभा मतदारसंघात 1 हजार 65
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 849,
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 908,
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 902,
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 953 व
शिरोळ विधानसभा मतदारसंघात 752