महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दर्शनची शाही बडदास्तप्रकरणी 9 कारागृह अधिकारी निलंबित

06:16 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन एफआरआर : आरोपींना विविध कारागृहांत हलविणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अभिनेता दर्शन यांची कारागृहात शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याच्या कथित व्हायरल फोटोवरून खळबळ माजली आहे. या प्रकरणी बेंगळूरमधील परप्पन अग्रहार कारागृहातील मुख्य अधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांच्यासह 9 कारागृह अधिकाऱ्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.

परप्पन अग्रहार कारागृहात दर्शनला अनेक सुविधा पुरविण्यात येत असल्याची चर्चा होती. दरम्यान, रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दर्शन हातात कॉफी मग आणि सिगारेट धरून बसल्याचे दिसत आहे. त्याला सिगारेट आणि कॉफी प्राशनास अनुकूल करून देणाऱ्या दोन जेलरसह 9 अधिकाऱ्यांना कारागृह खात्याने निलंबित केले आहे. प्राथमिक चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जेलर शरणबसप्पा अमनगड आणि प्रभू एस. खंडेलवाल, साहाय्यक जेलर एल. एस. कुप्पेस्वामी, श्रीकांत तळवार, हेड वॉर्डर वेंकप्पा संपतकुमार आणि के. बसप्पा यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कारागृहाला भेट देऊन अधिक माहिती घेतल्यानंतर कारागृहाचे मुख्य अधीक्षक शेषमूर्ती आणि अधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात जास्त अधिकारी सहभागी असल्याचे तपासातून पुढे आल्यास त्यांनाही निलंबित केले जाईल, असे डॉ. परमेश्वर यांनी सांगितले.

दर्शनला व त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींना सिगारेट, खुर्ची, चहा किंवा कॉफी कोणी पुरविल्या याचा तपास केला जात आहे. कारागृह नियमांचे उल्लंघन केल्याच्या त्याच्याविरुद्ध तीन एफआयआर दागाल करण्यात आले आहेत. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

दर्शन आणि गँगला दुसऱ्या कारागृहात हलविणार

रेणुकास्वामी याच्या हत्या प्रकरणातील अभिनेता दर्शन आणि इतर आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलविण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. दर्शनची परप्पन कारागृहात शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही बाब गंभीरपणे विचारात घेण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच दर्शन व त्याच्या सहकाऱ्यांना राज्यातील विविध कारागृहांमध्ये स्थलांतरित करावे, अशी सूचना दिली. कारागृहाला भेट देऊन अहवाल देण्याची सूचनाही त्यांनी राज्य पोलीस महासंचालकांना दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article