For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात नव्याने 9 स्वच्छतागृहांची उभारणी होणार

11:31 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात नव्याने 9 स्वच्छतागृहांची उभारणी होणार
Advertisement

मनपाच्या सभेत ठराव संमत : जुन्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये स्वच्छतागृहांची कमतरता असल्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता शहरातील विविध ठिकाणी 9 स्वच्छतागृहे उभारणीसाठी निधी उपलब्ध झाला असून लवकरच कामाला सुरुवात करण्याचा ठराव गुरुवारी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. मात्र, यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी नवीन स्वच्छतागृहांची उभारणी करा, त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, पूर्वी असलेल्या स्वच्छतागृहांची प्रथम दुरुस्ती करा, अशी जोरदार मागणी केली.

विशेषकरून खासबाग येथे भरणाऱ्या बाजाराच्या ठिकाणीच स्वच्छतागृहाची निगा नसल्याने समस्या निर्माण झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. महापालिकेने त्या व्यावसायिकांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. सुविधा देत नसतानाही त्यांच्याकडून कर आकारणी केली जात आहे. जर तुम्ही सुविधा उपलब्ध करत नसाल तर कशासाठी कर वसूल करता? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. यावर अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी निश्चितच तेथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले.

Advertisement

स्वच्छतागृह नसल्याने समस्या 

रविवारी खासबाग येथे बाजार भरविला जातो. त्यामुळे त्यादिवशी 25 हजारहून अधिक लोकांची वर्दळ त्या परिसरात होत असते. मात्र, बाजारासाठी आलेल्या नागरिकांना व महिलांना स्वच्छतागृहच नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा पूर्वीपासून असलेल्या स्वच्छतागृहांची प्रथम दुरुस्ती करा, अशी मागणी केली. नवीन स्वच्छतागृहांना म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी संमती दिली आहे.

शहरात या ठिकाणी होणार स्वच्छतागृहे...

महापालिका शहरामध्ये एकूण 9 स्वच्छतागृहे उभारणार आहे. त्यामध्ये मारुती गल्ली-यरमाळ रोड, वड्डर छावणी, लाल तलाव अनगोळ, मारुती गल्ली-खासबाग, सपना हॉटेल-शहापूर, बेळगाव वन-अशोकनगर, महापालिकेची जुनी इमारत, कसाई गल्ली, नाथ पै चौक परिसरात ही स्वच्छतागृहे होणार आहेत.

Advertisement
Tags :

.