गहाळ झालेले ९ लाखांचे मोबाईल वाई पोलिसांकडून परत
07:52 PM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सातारा :
Advertisement
सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि डीवायएसपी बाळासाहेब भालचिम यांनी दिलेल्या सुचनेनुसार वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी डीबी पथकास मार्गदर्शन करुन गहाळ झालेल्या मोबाईचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. डीबी पथकाने शोध घेवून राज्यासह इतर राज्यातून गहाळ झालेले ४२ मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना परत करण्यात आले. ही कारवाई वाई पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूज, हवालदार धीरज जाधव, पो. कॉ. रामा कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत - शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे, सागर नेवसे, महेश पवार यांनी केली. वाई पोलिसांचे अभिनंदन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.
Advertisement
Advertisement