For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बस दरीत कोसळून आंध्रात 9 जण ठार

06:37 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
बस दरीत कोसळून आंध्रात 9 जण ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू (एएसआर) जिह्यात बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. अपघातसमयी बसमध्ये सुमारे 40 जण होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चिंतुरू आणि भद्राचलम दरम्यानच्या घाटमार्गात हा अपघात झाल्याचे एएसआरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळावरील व्हिडिओ आणि फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाले असून त्यात बस दरीतील दाट झुडुपात अडकल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.