लगोरीत गोव्याच्या पुरूषांनी मिळविले सुवर्ण तर महिलांना कास्य
11:34 AM Nov 07, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
मडगांव : प्रायोगिक तत्वावर यंदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समाविष्ठ करण्यात आलेल्या लगोरी क्रीडा प्रकारात गोव्याच्या पुरूष संघाने सुवर्ण तर महिला संघाने कास्यपदक मिळविले. या स्पर्धेचे आयोजन कांपाल येथील क्रीडा ग्राममध्ये झाले. गोव्याला मिळालेली ही पदकांचा मात्र गुणतालिकेत खात्यात जमा होणार नाहीत. गोव्याच्या पुरूष संघाने अंतिम फेरीत महाराष्ट्राचा 10-3 व 22-18 असा पराभव केला. महाराष्ट्राला रौप्यपदक तर झारखंडला कास्यपदक मिळाले. महिला विभागात झालेल्या अंतिम लढतीत हरियाणाने राजस्थानचा पराभव केला. राजस्थानला रौप्यपदक तर झारखंडला नमविणाऱ्या गोव्याला कास्यपदक प्राप्त झाले. बक्षीस वितरण क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सारात, रिना गावडे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचश सदस्य अमिताभ शर्मा, लगोरी संघटनेच्या शुभदा सावईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article