For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी

06:07 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुरी जगन्नाथ मंदिरात घुसले 9 बांगलादेशी
Advertisement

बिगरहिंदूंना मंदिरात प्रवेश नाही : सर्व आरोपी ताब्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ पुरी

पुरी येथील जगन्नाथ मंदिरात अनधिकृत स्वरुपात 9 बांगलादेशी नागरिक घुसले होते. ओडिशा पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी अनेक बांगलादेशींना प्रवेशबंदीचे उल्लंघन करताना पकडले होते. बांगलादेशी नागरिक 12 व्या शतकातील मंदिरात प्रवेश करत होते. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेने सिंहद्वार पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.

Advertisement

तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांचे एक पथक मंदिरात पोहोचले आणि चौकशीसाठी पर्यटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बांगलादेशातून आलेल्या काही बिगरहिंदू लोकांनी मंदिरात प्रवेश केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली. याचमुळे आम्ही या बांगलादेशी नागरिकांची चौकशी सुरू केल्याची माहिती पुरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुशील मिश्रा यांनी दिली आहे.

केवळ हिंदूंनाच मंदिरात प्रवेश

मंदिराच्या नियमांनुसार केवळ हिंदूंनाच मंदिरात प्रवेश करण्याची अनुमती आहे. आरोपी जर बिगरहिंदू असल्याचे समोर आल्यास त्यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. आम्ही त्यांच्या पासपोर्टची पडताळणी करत आहोत. संबंधित आरोपींपैकी एक जण हिंदू असल्याचे कळले आहे. इतर आरोपींच्या पासपोर्टची तपासणी करत आहोत. 9 पैकी 4 बांगलादेशींनी मंदिरात प्रवेश केला होता असे प्रारंभिक तपासातून स्पष्ट झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

काही दिवसांपूर्वी युट्यूबर काम्या जानी हिने जगन्नाथ मंदिरात प्रवेश केल्याने वाद निर्माण झाला होता. काम्या ही बीफचे सेवन करते. तर जगन्नाथ मंदिराच्या नियमावलीनुसार बिगरहिंदू तसेच बीफ सेवन करणाऱ्यांना मंदिरात प्रवेशाची अनुमती नाही. वाद उभा ठाकल्यावर आपण  बीफ खात नसल्याचा दावा काम्याने केला होता.

Advertisement
Tags :

.