एटीएम सर्व्हर हॅक करून 9.24 लाख पळविले
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात सायबर गुन्हे वाढत असतानाच, आरबीएल बँकेचे एटीएम हॅक करून अज्ञात संशयितांनी खातेदारंचे 9 लाख 24 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत बॅकेचे अधिकारी विक्रांत कदम यांनी सायबर गुन्हा विरोदी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
सायहर गुन्हा विरोधी विभागाने अज्ञात संशयितांविरोधात भादंसं 420, तसेच आयटी कायदा कलमा 66 व 66 (डी) खाली गुन्हा नोंद केला आहे. सायबर गुन्हा विरोधी विभागाने याबाबत तपास सुरु केला आहे.
बँकेच्या पणजी, म्हापसा, कळंगुट, आणि मडगाव येथील एटीएमचे सर्व्हर हॅक करून ग्राहकंच्या खात्यारील पैसे परस्पर काढल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्यानंतर बँकेने तातडीने सायबर गुन्हा विरोधी विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. आत्तापर्यंत बँकेच्या चार एटीएममधून 9 लाख 24 हजार रुपये काढल्याचे चौकशीत दिसून आले आहे. या प्रकारे अधिक तपशील गोळा करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सायबर गुन्हा विरोधी विभागाने सुरु केली असून लवकरच असून लवकरच संबंधीत संशयिताला अटक केली जाईल असे पोलासंनी सांगितले आहे.