ऑगस्टमध्ये 9.2 लाख कोटी क्रेडिट कार्डे वितरीत
नवी दिल्ली :
ऑनलाइन शॉपिंग असो की मॉलमध्ये आजकाल क्रेडिट कार्डचा वापर खरेदीत हमखास केला जातो. क्रेडिट कार्डची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात बँकांनी जवळपास 9.2 लाख क्रेडिट कार्डांचे वितरण केले असल्याचे समजते आहे. येणाऱ्या काळात वेगवेगळे सण साजरे केले जाणार असून यादरम्यान क्रेडिट कार्डची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांनी जवळपास 9.2 लाख क्रेडिट कार्डांचे वितरण ग्राहकांना केले आहे. देशामध्ये सध्याला क्रेडिट कार्ड्सची एकंदर संख्या 10.55 कोटी झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार जुलैमध्ये 7.55 लाख व्रेडिट कार्डे जारी करण्यात आली होती. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण खर्चामध्ये 1.69 लाख कोटीची घट झालेली आहे. जुलैमध्ये ही घट 1.73 लाख कोटी इतकी होती. मासिक आधारावर कार्डच्या संख्येमध्ये 22 टक्के वाढ झालेली पाहायला मिळाली.