कोळशापासून गॅसनिर्मितीसाठी 8,500 कोटी
केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय : बैठकीत पंतप्रधान मोदींचे विशेष आभार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा विधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा संघटना आणि सरकारच्या कामात सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोळशापासून गॅस बनवण्यासाठी केंद्र सरकार 8,500 कोटी ऊपये देण्याचा निर्णय घेतला. या निर्मितीमध्ये कोल इंडिया लिमिटेड आणि गेल या दोन्ही कंपन्यांनी मदत घेतली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुऊवातीलाच अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा यशस्वी केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पॅबिनेट सदस्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्र्यांनीही पंतप्रधानांचे आभार मानले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने कोळसा विभाग आणि कोळशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोळसा खाणकामात भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. 80 टक्के कोळसा वीज निर्मितीसाठी वापरला जातो. 2025-26 मध्ये कोळशाची निर्यात बंद केली जाईल, ती फक्त काही प्रकल्पांसाठी सुरू राहील, असेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत राम मंदिरावर प्रामुख्याने चर्चा झाली. यादरम्यान, पंतप्रधानांनी पॅबिनेट मंत्र्यांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा परिणाम आणि मोठ्या प्रमाणावर जनतेच्या संदेशावर अभिप्राय घेतला.
पंतप्रधान मोदींमुळे मनोबल उंचावले!
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा अभूतपूर्व पद्धतीने यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी ही संधी आयुष्यात एकदा नाही तर अनेक आयुष्यात एकदाच मिळते. देशाची सर्वोच्च समिती असलेल्या मंत्रिमंडळात आपण सर्वजण यावेळी उपस्थित आहोत हे आपले भाग्य आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या कृतीने देशाचे मनोबल उंचावले आहे, असे गौरवोद्गार अनुराग ठाकूर यांनी काढले.
मंत्र्यांनी मार्चमध्ये अयोध्या दर्शन करावे : पंतप्रधान
मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत जनतेमध्ये असलेल्या भावनांचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्रिमंडळात मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांचे आभार मानले. त्याला सर्व मंत्र्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या अयोध्या राम मंदिराला भेट देण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रचंड गर्दी आणि प्रोटोकॉल नसलेल्या व्हीआयपींमुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी मार्चमध्ये अयोध्या दौऱ्याचे नियोजन करावे, असे पंतप्रधानांनी सुचविले आहे.