खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी एअरटेलने 8,465 कोटी भरले
2016 मधील खरेदी व्यवहाराचे सरकारला केले पेमेंट
नवी दिल्ली :
दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख भारती एअरटेलने सोमवारी जाहीर केले की, त्यांनी 2016 मध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी सरकारला 8,465 कोटी रुपये दिले आहेत. या दायित्वावर 9.3 टक्के व्याज दर लागू होता, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. भारतातील आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने 2016 मध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार विभागाला (भारत सरकार) 8,465 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट केले आहे, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
कंपनीने असेही म्हटले आहे की, ‘जूनमध्ये त्यांनी दूरसंचार विभागाला 7,904 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट केले आहे, 2012 ते 2015 दरम्यान खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी सर्व स्थगित दायित्वे पूर्ण केली आहेत. 2012 आणि 2015, ज्यात अनुक्रमे 9.75टक्के आणि 10 टक्के व्याज होते,’ कंपनीने सांगितले. प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, या वर्षी जानेवारीमध्ये, भारती एअरटेलने 2015 च्या लिलावात खरेदी केलेल्या एअरवेव्हसाठी दूरसंचार विभागाला 8,325 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली.