For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

८२ लाख निधीच्या विकासकामांना मंजुरी

11:09 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
८२ लाख निधीच्या विकासकामांना मंजुरी
Advertisement

खानापूर नगरपंचायतीची विशेष बैठक 

Advertisement

खानापूर : पंधराव्या वित्त आयोगाकडून शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 82 लाखाच्या निधीच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी नगरपंचायतीची विशेष बैठक गुऊवार 20 रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते. नगरपंचायतीचे प्रभारी तहसीलदार प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी संतोष कुर्वे आदी यावेळी उपस्थित होते. तसेच सर्व नगरसेवक नगरसेवकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.  प्रेमानंद देशपांडे यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगून पंधराव्या आयोगाकडून मंजूर झालेल्या 82 लाखाच्या निधीतून विकासकामे राबविण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना मांडली. यावेळी नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील विकासकामांना निधी देण्याची जोरदार मागणी केली.

बैठकीत खडाजंगी झाली होती. यावेळी चर्चेनंतर पंधराव्या आयोगातून मंजूर झालेल्या 82 लाखाच्या निधीच्या वापरासंबंधित आराखडा तयार करण्यात आला विकासासाठी 32 लाख, कचरा डेपोच्या विकासासाठी 25 लाख तर पाणीपुरवठा योजनेसाठी 25 लाखाचा निधी वापरण्याची तरतूद केली आहे  शिवस्मारक ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंत रस्त्याचा विकास करणे तसेच मनसापूर येथील कचरा डेपोच्या विकासासाठी 25 लाखाची तरतूद केली असून यात प्लॅटफॉर्म तयार करणे तसेच संरक्षण भिंत बांधणे असा आराखडा तयार केला आहे. शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 25 लाखाच्या निधीतून 50 एचपीची नवी मोटर तसेच पाणीपुरवठा योजनेतील पाणी शुद्धीकरण यंत्रणेचा विकास करणे असा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. लवकरच कामाचे टेंडर करण्यात येणार असल्याचे ठरविले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.