For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : सोलापूर मध्य रेल्वेकडून ८,१८४ गुन्हेगारांना अटक

05:59 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   सोलापूर मध्य रेल्वेकडून ८ १८४ गुन्हेगारांना अटक
Advertisement

                             ३८ लाख रुपयांचा दंड वसूल

Advertisement

सोलापूर : रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी मध्य रेल्वेने ऑक्टोबर २०२५ महिन्यात मोठी मोहीम राबवली. या कालावधीत रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत एकूण ८ हजार १८४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३८.०३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे मालमत्ता व प्रवासी सुरक्षेवर होत असलेल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी आरपीएफने गुप्त माहितीच्या आधारावर विविध ठिकाणी छापा टाकला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या २४३ जणांना गाठून दंडातून ६२,२०० रुपये वसूल करण्यात आले. रेल्वे मालमत्तेची चोरी करणाऱ्या ५९ आरोपींना अटक करून ४.६२ लाख रुपये दंड आणि चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच दारू, गांजा, तंबाखू यांसारखे पदार्थ बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त मालाची किंमत ८.२१ लाख रुपये आहे. प्रवाशांच्या सामान चोरी व इतर गुन्ह्यांत १६१ जणांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

मध्य रेल्वेने सांगितले की, त्यांचे प्राथमिक ध्येय प्रवाशांची सुरक्षा असून, आरपीएफची प्रशिक्षित टीम सतत दक्षता व तत्परता ठेवून सेवा देत आहे. मध्य रेल्वे अंतर्गत कोणत्याही गैरप्रकारांना पाय रोवू न देण्यासाठी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरपीएफच्या महत्त्वाच्या सुरक्षा उपाययोजना

१. रेल्वे परिसर व गाड्यांमध्ये २४७सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था
२. वंदे भारत, राजधानी, मेल-एक्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांमध्ये आरपीएफ एरकॉटिंग
३. गर्दीच्या वेळेत पहिला व शेवटचा डबा आरपीएफकडून सुरक्षेसाठी राखीव
४. महिलांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी महिला डब्यांचे एस्कॉटिंग
५. प्रमुख स्थानकांवर सीएसएमटी, एलटीटी, पुणे, नाशिक रोड, सोलापूर, दौंड, जळगाव, नागपूर येथे 'मेरी सहेली' पथके
६. मुंबई विभागात ५४ 'स्मार्ट सहेली' व्हॉट्सअॅप ग्रुप, ज्यात २३ हजार ३३८ महिला सक्रिय
७. ईएमयूच्या सर्व ७८८ महिला कोचमध्ये सीसीटीव्ही आणि आपत्कालीन टॉक बँक प्रणाली.

Advertisement
Tags :

.