81 वर्षे जुन्या रहस्याची उकल
दुसऱ्या महायुद्धात बुडालेल्या पाणबुडीचा शोध
समुद्रात जुने जहाज, युद्धनौका आणि पाणबुड्यांना शोधणाऱ्या समुहाने 81 वर्षे जुन्या रहस्याची उकल केली आहे. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रहस्यमय प्रकारे गायब झालेली ब्रिटिश पाणबुडी एचएमएस ट्रूपरला ग्रीसच्या कालामोस बेटानजीक एजिन समुद्रात 770 फूटांच्या खोलवर शोधण्यात आले आहे. एचएमएस ट्रूपरला एन91 असेही संबोधिले जात होते. ही पाणबुडी एका गुप्त मोहिमेवर ऑक्टोबर 1943 रोजी रवाना झाली होती. तीन ग्रीक रेजिस्टेंस एजंट्सना कालामोस बेटावर पोहोचविण्याचे कार्य होते. त्याचवेळी पाणबुडीला एजियन समुद्रात गस्त घालण्याचा निर्देश आला, परंतु जर्मनीच्या नौदलाने समुद्रात भुसुरुंग पेरल्याची कल्पना पाणबुडीवरील नौसैनिकांना नव्हती. 17 ऑक्टोबर 1943 रोजी 64 सैनिकांसोबत ही पाणबुडी रहस्यमय प्रकारे गायब झाली. ग्रीक अंडरवॉटर तज्ञ कोस्तास थोक्टेरिड्स यांच्या टीमने आता या पाणबुडीचा शोध लावला आहे. ही एजियन बेटाच्या उत्तरेस एकॅरियन समुद्रात मिळाली आहे. हा समुद्र स्वत:चे खराब हवामान आणि तीव्र लाटांसाठी ओळखला जातो.
इकॅरियन समुद्रात सागरी लाटा अत्यंत तीव्र असतात. म्हणजेच अंडरवॉटर कंरट सांभाळून नेव्हिगेट करणे अत्यंत अवघड असते असे कोस्तास यांचे सांगणे आहे. कोस्तास हे ग्रीक अंडरवॉटर रिकव्हरी कपंनी प्लॅनेट ब्ल्यूचे मालक आहेत. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी त्यांच्या टीमने यापूर्वी 14 प्रयत्न केले, परंतु सर्व अयशस्वी ठरले होते.
3 ऑक्टोबरला लागला शोध
कोस्तास आणि त्यांच्या टीमने दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातील दस्तऐवज पडताळून पाहिले. मग ट्रूपरचे लास्ट लोकेशन काय होते हे शोधून काढले. यासंबंधी दस्तऐवजांमध्ये माहिती होती. यानंतर शोध सुरू करण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या टीमला ही पाणबुडी दिसून आली. प्रथम सोनारद्वारे पाणबुडी शोधण्यात आली.
रोबो व्हेईकलचा वापर
कोस्तास यांनी रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल सुपर एशिलीला खोल समुद्रात पाठविले. तेव्हा ट्रूपर 770 फूट खोल समुद्रात असल्याचे आढळून आले. प्लॅनेट ब्ल्यूने युद्धात बुडालेल्या 8 पाणबुड्यांचा शोध लावला आहे.
विस्फोटामुळे झाले होते तीन तुकडे
मोठ्या विस्फोटामुळे पाणबुडी तीन मोठ्या तुकड्यांमध्ये विभागली गेल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. बो, मिडशिप आणि स्टर्न असे त्याचे हिस्से झाले होते. तर स्फोट हा जर्मनीकडून पेरण्यात आलेल्या भुसुरुंगांमुळे झाला होता. पाणबुडी जेव्हा भुसुरुंगाला धडकली होती. तेव्हा ती पाण्याच्या पृष्ठभागावर होती असेही समोर आले आहे.