महिलेच्या शरीरावर 800 टॅटू
महिलेला पाहून घाबरतात लोक
स्वत:च्या पूर्ण शरीरावर जवळपास 800 टॅटू काढून घेणारी महिला सध्या चर्चेत आहे. किडरमिनस्टर येथील 46 वर्षीय मेलिसा स्लोअन ही सात मुलांची आई आहे. तिने स्वत:च्या चेहऱ्यावरही अजब टॅटू काढून घेतले आहेत. याचमुळे तिचा लुक अत्यंत भीतीदायक वाटतो.
मेलिसाचा घाबरविणारा लुक अनोळखी लोकांना चकित करणारा आहे. वयाच्या 20 व्या वर्षी शरीरावर कलेचा संग्रह करण्यास सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत हे जारी ठेवले असल्याचे मेलिसा सांगते. स्थायी स्वरुपात स्वत:च्या शरीर आणि चेहऱ्यावर टॅटू काढून घेतल्याने तिला मोठे नुकसान देखील झाले आहे.
चेहऱ्यावर टॅटू काढून घेणे पसंत
माझ्या त्वचेवर नक्षीकाम करणे मला अत्यंत पसंत आहे. मुख्यकरून घरात ‘जेल स्टाइल’मध्ये मी हे करत असते. परंतु अनेक लोकांना हे पसंत नसल्याचे ती सांगते. सात मुलांची आई असलेल्या मेलिसाला यामुळे समाजात मिसळून जाण्यास अत्यंत त्रास होतो. लोक त्यांना सार्वजनिक ठिकाणांवर आयोजित कार्यक्रमात बोलावित नाहीत.
लोक करत नाहीत मैत्री
टॅटूंमुळे मेलिसाचे फारसे मित्र नाहीत. लोक चेहऱ्यावर तीन थरयुक्त शाईच्या आवरणापुढे पाहु शकत नाहीत. याचमुळे लोक माझ्याजवळ येऊ इच्छित नाहीत. अत्यंत कमी लोक माझे मित्र आहेत. टीका होऊनही मी दर आठवड्यात तीन ते चारवेळा स्वत:च्या चेहऱ्यावर आणि शरीरावर शाई लावून घेणे जारी ठेवून आहे. भले मग याचा अर्थ सामाजिक बहिष्कारच का नसो असे मेलिसाने म्हटले आहे.
दुर्दैवाने मी कधीच हॅलोविन पार्टीत गेलेली नाही. अत्यंत भीतीदायक चेहऱ्यामुळे लोक मला पार्ट्यांमध्ये बोलावित नाहीत. याचमुळे मी फेस्टिव्हलमध्ये सामील होत नाही. जर त्यांनी मला हॅलोविन पार्टीत बोलविले तर मी आत शिरताच सर्वांना घाबरविणारी ठरेन मी जव्हा स्वत:च्या मुलांना घेऊन हॅलोविन पार्टीत जायचे तेव्हा मला दारावरच रोखले जात होते. माझी मुले देखील मला मागे राहण्यास सांगायचे. तेव्हा पूर्ण रात्री झाडामागे राहून दूरूनच हॅलोविन पार्टी पाहायचे असे मेलिसा सांगते.