महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात 80 टक्के लैंगिक अत्याचार प्रेमप्रकरणातून

12:08 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राऊंड टेबल कॉन्फरन्सात तज्ञांची मते : कुर्टी-फोंडा येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीत,लैंगिक अत्याचार तपासावर कार्यशाळा उत्साहात

Advertisement

फोंडा : गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळविताना लैंगिक अत्याचारांच्या तक्रारीत दरवर्षी चढता आलेख पाहायला मिळतो. प्रत्येक पालकांने आपल्या पाल्यांना 18 वर्षे होईपर्यत सक्तीने शिस्त लावणे अनिवार्य आहे, ही  काळाजी गरज बनलेली आहे. आज 80 टक्के प्रकरणे ही प्रेमकरणातून किंवा ओळखीच्या नातलगांकडून झालेली आहेत, तर अन्य 20 टक्के असंमतीने झालेली लैंगिक प्रकरणे अशा श्रेणीत मोडतात, असा निष्कर्ष उपलब्ध आकडेवारीतून दिसून येतो. बाल सुरक्षेसाठी असलेली 1098 सेवेचे काम धिम्या गतीने चालत असून गोवा पोलिसांच्या पिंक फोर्सच्या माध्यमातून केवळ जबाबदारी झटकण्याचे काम सरकारने केलेले आहे असे मत विविध खात्यातील तज्ञ व्यक्तींमधून मांडले.

Advertisement

कुर्टी-फोंडा येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गोवा कॅम्प्समध्ये लैंगिक अत्याच्याराच्या तपासावर एक दिवशीय कार्यशाळेच्या समारोपाच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या सत्रात तज्ञांनी मते मांडली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त फॉरेन्सिक तज्ञ डॉ. सिल्वन सापेको यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत युके येथील केंट युनिव्हर्सिटीचे प्रा. रॉबर्ट ग्रिन यांच्यासह, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गोवा कॅम्प्सचे डिन प्रा. डॉ. लोकेश चौहान, गोवा बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बॉर्जेस, अभियोग संचालनालयाच्या संचालक पूनम भरणे, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक डॉ. एन. पी. वाघमारे, स्टॅप स्कॅन गोवाचे संचालक एमिडीओ पिन्हो, अभियोग संचालनालयाचे उपसंचालक मिलेना, पोलीस अधिक्षक बॉस्युएट सिल्वा, पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर, महिला विकास (जिपार्ड)च्या आर्लेट मास्कारेन्हास, राष्ट्रीय कायदा विद्यापीठ ओरीसाच्या प्रा. इनाक्षी गांगुली यानी सहभाग घेतला.

पोलिसांनी तपासात सहकार्य करणारी फलदायी विचारांची देवाणघेवाण

कार्यशाळेच्या माध्यमातून लैगिक अत्याच्याराशी संबंधित प्रकरणांच्या वेगाने तपासासाठी आंतरसंस्था समन्वयावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांना लैगिक प्रकरणे हाताळताना येणारी आव्हाने, पोलीसाचे तपासकाम, न्यायव्यवस्था, आरोग्य सेवा प्रदाते, व्यवसायिक आणि क्षेत्रातील इतर भागधारकांची विचारांची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतीसाठी एक व्यासपीठ ठरणार असा विश्वास प्रा. चौंहान यांनी व्यक्त केला. या बैठकीतील अहवाल सरकारी यंत्रणांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. पुरावे गोळा करण्यासाठी, साक्षीदारांची मुलाखात घेण्यासाठी आणि निष्कर्षाचा अहवालाविषयी महत्वाच्या विचारांची देवाणघेवाण तज्ञाकडून झाली.

तपासकामात एनएफएसयु येथील प्राध्यापकांचा अहवालही गाह्या

नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गोवा कॅम्पसमध्येही गोवा पोलिसांना लैगिक अत्dयाचाराच्या प्रकरणे हाताळण्यासाठी सक्षम असून भारतीय दंड संहितेच्या 293 ए कलमानुसार येथील प्राध्यापकांनाही फॉरेन्सिक वैज्ञानिक असा दर्जा प्राप्त झालेला आसून त्यांनी दिलेला अहवाल न्यायालयातही गाह्या धरण्यात येत असल्याची माहिती यावेळी डिन लोकेश चौहान यांनी दिली. सकाळच्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन महिला व बाल कल्याण मंत्रालयाचे सचिव अरूण कुमार मिश्रा यांच्याहस्ते झाले. यावेळी युविव्हर्सिटी ऑफ केंट युकेचे प्रख्यात वक्ता प्रा. रॉबर्ट ग्रीन, पोलीस अधिक्षक असलम खान, पिटर बॉर्जिस,  नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आणि गोवा पोलीसचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article