महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थकीत घरफाळ्याच्या दंडामध्ये 80 टक्के सवलत

01:11 PM Jan 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

महापालिकेच्या वतीने मंगळवारी घरफाळा थकीत असणाऱ्या मिळकत धारकांना मोठा दिलासा दिला. थकीत घरफाळ्याच्या थकित व्याजाच्या दंडामध्ये महापालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच 80 टक्के इतकी सवलत योजना लागू करण्यात आली आहे. 15 जानेवारी पासून 15 फेब्रुवारी पर्यंत ही सवलत योजना असणार आहे. यानंतर मात्र थकीत दंडावर 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

महापालिकेच्या 2024-25 च्या अंदाजपत्रकामध्ये 588 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेच्या विविध विभागांना देण्यात आले आहे. एप्रिल 2024 पासून विविध विभागांची 310 कोटी रुपयांच्या आसपास वसुली झाली आहे. उर्वरीत वसुलीसाठी विविध विभागांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी थकबाकीदारांना थकीत दंडाच्या व्याजामध्ये सवलत देण्यात येते. उपसमितीने घरफाळा, पाणीपुरवठा आणि परवाना अशा तिनही विभागांच्या थकबाकीदारांना सवलत देण्याचा प्रस्ताव प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठविला होता. मंगळवारी सकाळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी घरफाळा विभागाच्या सवलत प्रस्ताव मंजूर केला. 2024 - 25 या वर्षाकरीता सवलत योजना लागू करण्यात आली. यामध्ये सवलतीचे दोन टप्पे निश्चीत करण्यात आले आहेत. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान थकीत रक्कम भरल्यास त्यावरील दंडामध्ये 80 टक्के सुट मिळणार आहे. तर 15 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत रक्कम भरल्यास 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी या सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

थकीत घरफाळा आणि दंडापोटी ज्या मिळकत सिल करण्यात आल्या आहेत. अशा मिळकत धारकांना सुद्धा या सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या कालावधीत कोणतेही प्रलंबित असलेले अपील पुनर्निरीक्षणासाठी आलेले आवेदन संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घेणाऱ्या संबंधीत मिळकत धारकास याचा लाभ देण्यात येणार आहे.

मालमत्ता कराची (घरफाळा) रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात जमा करण्याची सुविधा आहे. नागरिकांच्या सोईकरीता दर शनिवारी देखील सुट्टीचे दिवशी सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु राहणार आहेत. यामुळे नागरीकांनी शनिवारी देखील रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नागरीकांना ऑनलाईन भरणा करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. जे थकबाकीदार आर्थिक अडचणीमध्ये असतात आणि सवलतीच्या काळात आर्थिक नियोजन करु शकत नाहीत अशा घटकांचाही यामध्ये विचार करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच जे वर्षानुवर्षे थकबाकीदार आहेत त्यांनाही यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे असलेली थकबाकी वसुल होवून महापालिकेचे उत्पन्न वाढाण्याच्या दृष्टीने हे पाउल उचलण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article