Miraj : मिरज-पुणे मार्गावर आज ८ रेल्वे गाड्या रद्द
मिरज ते सातारा रेल्वे मार्गावर कामानिमित्त तात्पुरती बदल
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील मसूर ते सातारा दरम्यान दुहेरीकरणासाठी एक दिवसाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याकरता गुरुवारी ६ नोव्हेंबर रोजी मिरजेतून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या ब्लॉकमुळे कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, कोल्हापूर-सातारा आणि सातारा-कोल्हापूर पॅसेंजर, कोल्हापूर मुंबई आणि मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, दुपारी दोन वाजता सुटणारी मिरज कोल्हापूर आणि कोल्हापूर मिरज पॅसेंजर या तब्बल आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर यशवंतपुर-चंदीगड एक्सप्रेस, निजामुद्दीन-यशवंतपुर एक्सप्रेस आणि बेंगलोर जोधपुर एक्सप्रेस या तीन एक्सप्रेस कुडूवाडी आणि दौंड मार्गे धावणार आहेत.
, तसेच कोल्हापूर पुणे पॅसेंजर किर्लोस्करवाडीपर्यंत कोल्हापूर पुणे वंदे भारत कराडपर्यंत धावेल. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावेल. पुणे कोल्हापूर पॅसेंजर किर्लोस्करवाडीतून कोल्हापूरसाठी सुटेल. ती पुणे ते किर्लोस्करवाडी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. पुणे हुबळी वंदे भारत कराडपर्यंत धावेल. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यातून सुटेल ती कोल्हापूर ते पुणे रद्द करण्यात आली आहे.
पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस (०१०२३), कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्सप्रेस (०१०२४), कोल्हापूर-सातारा पॅसेंजर (७१४२४), सातारा-कोल्हापूर पॅसेंजर (७१४२३), कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (११०३०), मुंबई-कोल्हापूर कोयना एक्प्रेस (११०२९), मिरज-कोल्हापूर पॅसेंजर (७१४२५), कोल्हापूर-मिरज पॅसेंजर
(७१४२६) या आठ रेल्वे गाड्या धावणार नाहीत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्वाच्या रेल्वे गाड्या कुर्जुवाडी मार्गे वळविल्या आहेत. यामध्ये यशवंतपुर-चंदिगड एक्सप्रेस (२२६८५) निजामुद्दीन यशवंतपुर एक्सप्रेस (१२६३०) बेंगलोर जोधपुर एक्सप्रेस (१६५०८) या तीन गाड्या कुर्जुवाडी मार्गे वळविल्या आहेत. तर कोल्हापूर-पुणे पॅसेंजर (११४२६) किर्लोस्करवाडी पर्यंत, कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (२०६७३) कराड पर्यंत, गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (११०४०) पुण्यापर्यंत धावणार धावणार आहेत.
याशिवाय पुणे-कोल्हापूर पॅसेंजर (११४२५) किर्लोस्करवाडीतून सुटणार, किर्लोस्करवाडी ते पुणे रद्द करण्यात आली आहे. पुणे-हुबळी वंदेभारत एक्सप्रेस (२०६७०) कराड येथून हुबळीसाठी सुटणार, पुणे ते कराड रद्द झाली आहे. तर कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (११०३९) पुण्यातून गोंदियाकडे धावणार, पुणे ते कोल्हापूर रद्द करण्यात आली आहे. मिरज पुणे मार्गावरील रेल्वे दुहेरीकरण कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे त्या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय निर्माण होणार आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरु होतील असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.